Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > लेकीच्या लग्नाची आणि शिक्षणाची चिंता सोडा! सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून मिळवा ७१ लाख

लेकीच्या लग्नाची आणि शिक्षणाची चिंता सोडा! सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून मिळवा ७१ लाख

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने २२ जानेवारी २०१५ रोजी 'बेटी वाचवा, बेटी शिकवा' या मोहिमेचा भाग म्हणून सुरू केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:16 IST2026-01-23T10:58:11+5:302026-01-23T11:16:09+5:30

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारने २२ जानेवारी २०१५ रोजी 'बेटी वाचवा, बेटी शिकवा' या मोहिमेचा भाग म्हणून सुरू केली होती.

Sukanya Samriddhi Yojana 2026 Build a ₹72 Lakh Corpus for Your Daughter's Future | लेकीच्या लग्नाची आणि शिक्षणाची चिंता सोडा! सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून मिळवा ७१ लाख

लेकीच्या लग्नाची आणि शिक्षणाची चिंता सोडा! सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून मिळवा ७१ लाख

Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या 'सुकन्या समृद्धी योजने'ने यशस्वी ११ वर्षे पूर्ण केली आहेत. २२ जानेवारी २०१५ रोजी सुरू झालेली ही योजना आजही मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी बचतीचा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय मानली जाते. अत्यल्प गुंतवणूक आणि सरकारी हमी यामुळे मध्यमवर्गीय पालकांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय आहे.

व्याजदराच्या बाबतीत सर्व योजनांत 'अव्वल'
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या ८.२ टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे. विशेष म्हणजे, पीपीएफ किंवा इतर अल्पबचत योजनांच्या तुलनेत या योजनेचा व्याजदर सर्वाधिक आहे. सरकार दर तिमाहीला या व्याजाचा आढावा घेते आणि वर्षाच्या शेवटी हे व्याज खात्यात जमा केले जाते.

टॅक्समध्ये 'ट्रिपल' फायदा
गुंतवणुकीवर सवलत : कलम ८०-सी अंतर्गत १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर प्राप्तिकरात सवलत मिळते (जुन्या कर प्रणालीनुसार).
व्याजावर सूट : दरवर्षी मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त असते.
मॅच्युरिटीवर कर नाही : २१ वर्षांनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री असते.

१५ वर्षांची गुंतवणूक आणि ७२ लाखांचा फंड
जर एखाद्या पालकाने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेच हे खाते उघडले आणि दरवर्षी कमाल मर्यादा म्हणजे १.५० लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम थक्क करणारी आहे.

  • वार्षिक गुंतवणूक : १,५०,००० रुपये (दरमहा १२,५०० रुपये)
  • गुंतवणुकीचा कालावधी: १५ वर्षे
  • मॅच्युरिटी कालावधी : २१ वर्षे
  • सध्याचा व्याजदर : ८.२%
  • तुमची एकूण गुंतवणूक : २२,५०,००० रुपये
  • मिळणारे एकूण व्याज : ४९,३२,११९ रुपये
  • एकूण मॅच्युरिटी रक्कम : ७१,८२,११९ रुपये

वाचा - बाजारात सावध हालचाली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किरकोळ घसरण; गुंतवणुकीपूर्वी तपासा आजचे टॉप गेनर्स

योजनेच्या महत्त्वाच्या अटी
मुलीच्या जन्मापासून ते ती १० वर्षांची होईपर्यंत हे खाते उघडता येते. वर्षाला किमान २५० रुपये भरूनही खाते सुरू ठेवता येते. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करता येतात. पैसे १५ वर्षे जमा करायचे आहेत, पण खाते २१ वर्षांनी मॅच्युअर होते. मुलीच्या १८ व्या वर्षानंतर शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची सोय आहे.

Web Title : सुकन्या समृद्धि योजना में निवेश करें, बेटी का भविष्य सुरक्षित करें, ₹71 लाख कमाएं!

Web Summary : सुकन्या समृद्धि योजना, एक सरकारी पहल, 8.2% ब्याज प्रदान करती है। यह निवेश, ब्याज और परिपक्वता राशि पर कर लाभ प्रदान करता है। 15 वर्षों के लिए सालाना ₹1.5 लाख का निवेश करें और 21 वर्षों के बाद लगभग ₹71 लाख प्राप्त करें। खाता बालिका के 10 वर्ष की होने से पहले खोला जा सकता है।

Web Title : Invest in Sukanya Samriddhi Yojana, secure daughter's future, earn ₹71 lakh!

Web Summary : Sukanya Samriddhi Yojana, a government initiative, offers 8.2% interest. It provides tax benefits on investment, interest, and maturity amount. Invest ₹1.5 lakh annually for 15 years to get approximately ₹71 lakh after 21 years. Account can be opened before the girl child turns 10.