Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली

सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली

Share Market Today : भारतीय शेअर बाजार बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी चार दिवसाच्या तेजीनंतर घसरणीसह बंद झाला. नफावसुली झाल्याने बाजाराने सकाळची वाढ गमावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:10 IST2025-10-08T17:08:15+5:302025-10-08T17:10:32+5:30

Share Market Today : भारतीय शेअर बाजार बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी चार दिवसाच्या तेजीनंतर घसरणीसह बंद झाला. नफावसुली झाल्याने बाजाराने सकाळची वाढ गमावली.

Stock Market Today Nifty Slips Below 25,100; IT Sector Gains While Realty, Auto Plunge | सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली

सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली

Share Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग चार दिवसांच्या तेजीनंतर आज, ८ ऑक्टोबर रोजी जोरदार नफावसुली पाहायला मिळाली. यामुळे सेन्सेक्स सुमारे १५३ अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी २५,१०० च्या खाली आला. दिवसभरात बाजारात चढ-उतार दिसून आले. परंतु, दुपारनंतर आलेल्या विक्रीच्या दबावामुळे बाजाराने सकाळची सर्व वाढ गमावली. सेन्सेक्स दिवसभरातील उच्चांकावरून जवळपास ५०० अंकांनी घसरला.

बीएसई मिडकैप इंडेक्समध्ये ०.७% आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ०.४% ची घसरण नोंदवली गेली. या घसरणीमुळे, बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.३५ लाख कोटींनी घटले.

सेक्टोरल कामगिरी आणि सर्वाधिक वधारलेले/घसरलेले समभाग
आजच्या व्यवहारात बाजार पूर्णपणे कमजोर राहिला. केवळ दोनच क्षेत्रांनी काहीशी वाढ नोंदवली, तर उर्वरित क्षेत्रांत जोरदार विक्री दिसून आली.
तेजी असलेले सेक्टर्स
आजच्या व्यवहारात केवळ माहिती तंत्रज्ञान (१.५%) आणि कंझ्युमर ड्युरेबल्स (०.७%) हेच दोन सेक्टर तेजीसह बंद झाले. टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेकसारख्या आयटी कंपन्यांमध्ये झालेली खरेदी हे याचे मुख्य कारण होते.

घसरण झालेले सेक्टर्
रिअल्टी, टेलिकॉम, फार्मा, ऑईल ॲण्ड गॅस, मीडिया, पीएसयू बँक आणि ऑटो यांसारख्या प्रमुख सेक्टोरल इंडेक्समध्ये ०.३% ते २% पर्यंत घसरण नोंदवली गेली.

सर्वाधिक तेजी असलेले सेन्सेक्स समभागवाढ (टक्के)
टायटन४.३८%
इन्फोसिस२.६७%
टीसीएस२.५१%
एचसीएल टेक१.९१%
टेक महिंद्रा१.१७%

कुठे झाली सर्वाधिक घसरण?

सर्वाधिक घसरण झालेले सेन्सेक्स समभागघसरण (टक्के)
टाटा मोटर्स२.४१%
महिंद्रा ॲण्ड महिंद्रा१.९१%
भारत इलेक्ट्रॉनिक्स१.७२%
अल्ट्राटेक सिमेंट१.६५%
ट्रेन्ट१.४६%

शेअर बाजाराचा दृष्टिकोन
आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एकूण ४,३३० समभागांमध्ये व्यवहार झाला. यापैकी २,४३५ समभाग घसरणीसह बंद झाले, तर केवळ १,७४० समभाग तेजीत राहिले. याशिवाय, १६१ समभागांनी आज आपला नवा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर १४४ समभाग ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले. गुंतवणूकदारांनी केलेली नफावसुली आणि बाजारातील उच्च मूल्यांकनामुळे झालेल्या विक्रीमुळे आज बाजाराला ब्रेक लागला.

Web Title : मुनाफ़ा वसूली से 4 दिन की तेजी रुकी; बाजार को ₹2.35 लाख करोड़ का नुकसान।

Web Summary : भारतीय शेयर बाजार में 4 दिनों की तेजी के बाद मुनाफा वसूली हुई। सेंसेक्स गिरा, निफ्टी 25,100 से नीचे। आईटी और कंज्यूमर ड्यूरेबल्स में बढ़त; रियल्टी, टेलीकॉम में गिरावट। व्यापक बिकवाली के दबाव के कारण बाजार पूंजीकरण ₹2.35 लाख करोड़ घटा।

Web Title : Profit booking halts 4-day rally; market loses ₹2.35 lakh crore.

Web Summary : Indian stock market faced profit booking after a 4-day rally. Sensex fell, Nifty below 25,100. IT and consumer durables gained; realty, telecom declined. Market capitalization decreased by ₹2.35 lakh crore due to broad selling pressure.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.