Gold Bond Investment: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये (SGB) पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. केंद्रीय बँकेनं बुधवारी गोल्ड बॉण्डच्या दोन सिरीजसाठी रिडेम्प्शन प्राइस १२,८०१ रुपये प्रति युनिट निश्चित केली.
एका अधिकृत निवेदनानुसार, ज्या गुंतवणूकदारांकडे एसजीबी २०१७-१८ सिरीज XI चे बॉण्ड्स आहेत, त्यांना अंतिम पेमेंट म्हणून प्रति युनिट १२,८०१ रुपये मिळतील. हे बॉण्ड ११ डिसेंबर २०१७ रोजी जारी करण्यात आले होते. त्या वेळी एका युनिटची किंमत फक्त २,९५४ रुपये होती.
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, IT आणि मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी
याचा अर्थ, गुंतवणूकदारांना त्यांच्या खरेदी किमतीपेक्षा चार पटीहून अधिक पैसे परत मिळत आहेत. याशिवाय, त्यांना इतकी वर्षे जमा केलेल्या रकमेवर वार्षिक २.५ टक्के व्याज देखील वेगळं मिळालं आहे. यासोबतच, आरबीआयनं त्या गुंतवणूकदारांसाठीही तीच १२,८०१ रुपये किंमत निश्चित केली आहे, ज्यांना २०१९-२० सिरीज- १ मधून (ज्याची मॅच्युरिटी ११ डिसेंबर २०२५ रोजी आहे) वेळेपूर्वी बाहेर पडायचं आहे.
री-केवायसीवर एनआरआयना दिलासा
मुंबई शेअर बाजार नियामक सेबीनं (Sebi) परदेशात राहणाऱ्या भारतीयांना (NRIs) मोठा दिलासा दिला आहे. बुधवारी सेबीनं निर्णय घेतला की, आता एनआरआयना आपलं केवायसी अपडेट (Re-KYC) करण्यासाठी डिजिटल पडताळणीच्या वेळी भारतात उपस्थित राहण्याची गरज नाही. प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी सेबीनं हे पाऊल उचललं आहे.
