SIP vs STP Investment : एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. मात्र, एसटीपीबाबत (Systematic Transfer Plan) फार कमी जणांना माहिती आहे. म्युच्युअल फंड (Mutual Fund) स्कीम्समध्ये ठराविक तारखेला नियमित अंतरानं (अनेकदा महिन्यातून एकदा) एसआयपीची गुंतवणूक केली जाते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याचवेळी एसटीपीमध्ये गुंतवणूकदार म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये (सहसा डेट फंड) एकरकमी रक्कम गुंतवतात आणि नंतर नियमित अंतराने इक्विटी योजनांमध्ये ट्रान्सफर करतात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर एसटीपीच्या मदतीनं गुंतवणूकदार कमी जोखमीच्या योजनेतून डेट फंडातून इक्विटी फंडांसारख्या उच्च जोखमीच्या योजनेत पैसे हस्तांतरित करू शकतात. एसटीपी गुंतवणूकदारांना जोखीम व्यवस्थापित करण्यास आणि चांगला परतावा मिळविण्यात मदत करतात.
दोघांमधील प्रमुख फरक
एसआयपी अंतर्गत गुंतवणूकदाराच्या बँक खात्यातून थेट म्युच्युअल फंडात पैसे जमा केले जातात, ज्यामुळे शिस्तबद्ध गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते. याउलट, एसटीपीला डेट फंडांमध्ये प्रारंभिक एकरकमी गुंतवणुकीची आवश्यकता असते, ज्यातून नियमितपणे इक्विटी फंडांमध्ये पैसे हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे कालांतरानं धोरणात्मक गुंतवणूक करता येऊ शकते.
दोघांचेही निरनिराळे फायदे
एसआयपी रुपयाच्या किंमतीच्या सरासरीचा फायदा देतात, ज्यामुळे किंमती कमी असताना जास्त युनिट्स खरेदी करून आणि किंमती जास्त असताना कमी युनिट्स खरेदी करून बाजारातील चढउतारांचा प्रभाव कमी होतो. याव्यतिरिक्त, एसआयपी लवचिक आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना सर्वात कमी रकमेसह सुरुवात करण्यास आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार योगदान करण्यास अनुमती मिळते.
एसटीपीमुळे बाजारातील जोखीम कमी होण्यास मदत होते. शेअर बाजाराच्या कामगिरीच्या आधारे मालमत्तेचं वाटप करून परतावा वाढवतो. एसटीपी विशेषत: अधिक निधी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहेत आणि हळूहळू इक्विटीमध्ये गुंतवणूक करू इच्छितात, ज्यामुळे एकरकमी गुंतवणुकीशी संबंधित बाजारातील अस्थिरतेचा धोका कमी होतो. एसटीपी बाजारातील चढउतारांपासून गुंतवणूकदाराचं रक्षण करतात. एसटीपीमुळे गुंतवणूकदाराला रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचा फायदा होतो. एसटीपीच्या मदतीनं गुंतवणूकदाराला बाजारातील चढउतारांची चिंता करावी लागत नाही.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)