Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे

SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे

RD vs SIP : तुमची मासिक बचत आरडीमध्ये गुंतवणे चांगले की एसआयपीमध्ये? कोणता पर्याय तुमची संपत्ती वाढवण्यास खरोखर मदत करेल आणि या दोघांमध्ये योग्य संतुलन कसे साधायचे ते जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:05 IST2025-10-06T16:22:13+5:302025-10-06T17:05:23+5:30

RD vs SIP : तुमची मासिक बचत आरडीमध्ये गुंतवणे चांगले की एसआयपीमध्ये? कोणता पर्याय तुमची संपत्ती वाढवण्यास खरोखर मदत करेल आणि या दोघांमध्ये योग्य संतुलन कसे साधायचे ते जाणून घ्या.

SIP vs RD Expert Guide to Choosing the Best Monthly Investment for Long-Term Wealth Creation | SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे

SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे

RD vs SIP : भारतीय कुटुंबांमध्ये दर महिन्याला निश्चित रक्कम वाचवण्याची सवय खूप जुनी आहे. या बचतीसाठी पारंपारिकरित्या आवर्ती ठेव हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग मानला जात होता. पण, आता म्युच्युअल फंड्सचे एसआयपी सर्वसामान्य झाले आहेत. अशा परिस्थितीत, दर महिन्याला गुंतवणूक नेमकी कुठे करावी, RD मध्ये की SIP मध्ये? हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतो.

RD आणि SIP मधील मूलभूत फरक
आवर्ती ठेव (RD): यात तुम्ही दर महिन्याला निश्चित रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता. याचा व्याजदर निश्चित असतो, त्यामुळे यात जोखीम खूप कमी असते. हे तुमचे मूळधन सुरक्षित ठेवते.
पद्धतशीर गुंतवणूक योजना : हा म्युच्युअल फंडात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. यात जमा केलेली रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. यात थोडी जोखीम असली तरी, दीर्घकाळात जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

तपशील आवर्ती ठेव (RD) सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP)
परताव्याचा प्रकारनिश्चित आणि हमीबाजारावर आधारित, अस्थिर
जोखीम स्तर खूप कमीमध्यम ते उच्च
परताव्याची श्रेणी६% ते ७.५% (वार्षिक)१०% ते १५% (दीर्घकाळात)
उपयुक्त कालावधी३ वर्षांपेक्षा कमी (शॉर्ट टर्म)५ वर्षे किंवा त्याहून अधिक (लाँग टर्म)


दीर्घकाळात महागाईवर कोण मात करते?
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या पैशाची वास्तविक वाढ तेव्हाच होते, जेव्हा मिळणारा परतावा महागाईच्या दरापेक्षा जास्त असतो.
आरडीची मर्यादा: आरडीवर मिळणारा ४-७% परतावा अनेकदा महागाईच्या बरोबरीने राहतो. म्हणजेच, तुमचा पैसा सुरक्षित राहतो, पण त्याची खरेदी क्षमता वाढत नाही.
एसआयपीची ताकद: इक्विटी म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये ५ ते १० वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाच्या प्रभावामुळे १०-१५% पर्यंत परतावा मिळू शकतो. याचा अर्थ, एसआयपी तुमच्या पैशाला खऱ्या अर्थाने वाढवण्याची संधी देते.

टॅक्सेशनमध्ये मोठा फरक
गुंतवणुकीवर कर किती लागतो, हे देखील महत्त्वाचे आहे. इथे आरडी आणि एसआयपीमध्ये मोठा फरक आहे.
आवर्ती : आरडीवर मिळणारे व्याज दरवर्षी पूर्णपणे करपात्र असते आणि ते तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते.
एसआयपी : इक्विटी SIP मध्ये दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागतो. एका वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवल्यास, दरवर्षी १.२५ लाख रुपयांपर्यंतचा नफा करमुक्त असतो, त्यानंतर फक्त १२.५% दराने कर लागतो. ELSS फंडात गुंतवणूक केल्यास कलम ८०C अंतर्गत अतिरिक्त कर सवलत मिळते.

तुमचे ध्येय आणि जोखीम क्षमता महत्त्वाची
गुंतवणूक निवडताना तुमचा कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता निर्णायक ठरते.

  • शॉर्ट टर्मसाठी : कार खरेदी करणे, लग्न किंवा आपत्कालीन निधी जमा करणे अशा तीन वर्षांपर्यंतच्या सुरक्षित आणि निश्चित ध्येयांसाठी आरडी उत्तम आहे.
  • लाँग टर्मसाठी : मुलांचे शिक्षण, निवृत्ती नियोजन किंवा दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करण्यासाठी एसआयपी सर्वोत्तम आहे, कारण इथे कंपाउंडिंगचा जास्तीत जास्त फायदा मिळतो.

वाचा - अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान

तज्ज्ञांचा सल्ला : दोन्हीचा समन्वय साधा
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, एकच पर्याय निवडण्याऐवजी दोन्हीचा समतोल राखणे फायदेशीर ठरते.
यासाठी तुम्ही 'कोअर आणि सॅटेलाइट' ही रणनीती वापरू शकता.

  • आरडी : शॉर्ट-टर्मच्या गरजा आणि सुरक्षेसाठी आधार म्हणून आरडीमध्ये गुंतवणूक करा.
  • एसआयपी : दीर्घकाळात उच्च परतावा मिळवण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करा.
  • तुम्हाला फक्त सुरक्षितता हवी असल्यास आरडी निवडा, वाढ हवी असल्यास एसआयपीचा मार्ग निवडा आणि दोन्हीचा समन्वय हवा असल्यास दोन्हीमध्ये गुंतवणूक करून एक संतुलित पोर्टफोलिओ तयार करा.

Web Title : SIP बनाम RD: कहां निवेश करें? विशेषज्ञों ने बताए मुख्य अंतर।

Web Summary : RD कम जोखिम के साथ गारंटीड रिटर्न प्रदान करता है, जो अल्पकालिक लक्ष्यों के लिए आदर्श है। SIP, जोखिम भरा होने पर भी, लंबी अवधि में उच्च विकास की क्षमता प्रदान करता है, जो मुद्रास्फीति को मात देता है। विशेषज्ञ एक मजबूत पोर्टफोलियो के लिए दोनों को संतुलित करने की सलाह देते हैं।

Web Title : SIP vs. RD: Where to Invest? Experts Highlight Key Differences.

Web Summary : RD offers guaranteed returns with low risk, ideal for short-term goals. SIPs, though riskier, provide potential for higher long-term growth, outpacing inflation. Experts advise balancing both for a robust portfolio.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.