SIP Calculator Investment Tips: देशार्गत शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहेत. मात्र, बाजार आपल्या उच्च स्तराच्या जवळच व्यवहार करत आहेत. भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारातील या चढ-उताराचा थेट परिणाम म्युच्युअल फंड्सच्या कामगिरीवरही होतो. परंतु, भारतीय गुंतवणूकदार या अस्थिरतेनंतरही देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) मध्येही गुंतवणूकदार भरघोस पैसे गुंतवत आहेत. आज आपण येथे जाणून घेणार आहोत की, एसआयपीमध्ये दरमहा ५००० रुपयांची गुंतवणूक केल्यास २० वर्षांत किती फंड तयार होऊ शकतो?
५००० रुपयांच्या SIP मधून २० वर्षात किती होईल फंड
जर तुम्हाला दरवर्षी १२ टक्के अंदाजित परतावा मिळाला, तर ५००० रुपयांच्या एसआयपीमधून २० वर्षांत सुमारे ४६ लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. यामध्ये तुमची १२ लाख रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे ३४ लाख रुपयांच्या परताव्याचा समावेश असेल.
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आधार अपडेट केलं नाही तर ब्लॉक होणार YONO App?
त्याचप्रमाणे, जर तुम्हाला दरवर्षी १५ टक्के अंदाजित परतावा मिळाला, तर ५००० रुपयांच्या एसआयपीमधून २० वर्षांत सुमारे ६६.३५ लाख रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. यामध्ये तुमची १२ लाख रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे ५४.३५ लाख रुपयांच्या अंदाजित परताव्याचा समावेश असेल.
एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एसआयपीमध्ये कधीही एकसमान परतावा मिळत नाही. मात्र, दीर्घ कालावधीत नुकसानीची जोखीम बरीच कमी होते. एसआयपीमधून तुम्हाला जो परतावा मिळतो, त्यावर तुम्हाला कॅपिटल गेन्स टॅक्स (Capital Gains Tax) देखील भरावा लागतो. एसआयपीमधून तुम्हाला किती परतावा मिळेल, हे पूर्णपणे शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असते. जर बाजारात तेजी राहिली तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. त्याचप्रमाणे, जर बाजारात घसरण झाली तर तुम्हाला नुकसानही सोसावं लागू शकतं.
(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
