Silver Price Today: चांदीने आज आपले जुने सर्व विक्रम मोडीत काढत विक्रमी उच्चांक गाठला आहे. बुधवारी चांदीच्या वायद्यांचा भाव १.९० रुपयांची पातळी ओलांडून १९०३७४ रुपये प्रति किलोग्रामच्या स्तरावर पोहोचला. तर, सोन्याचा भाव १.३० लाख रुपयांच्या वर ट्रेड करत होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रथमच ६० डॉलर्स प्रति औंसच्या पुढे गेली आहे. बुधवारी १.३ टक्क्यांच्या तेजीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर ६१.४७९७ डॉलर प्रति औंसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. या तेजीमागे यूएस फेड रिझर्व्हकडून संभाव्य दर कपातीचं कारण सांगितलं जात आहे. ही बैठक ९ ते १० डिसेंबरला होत आहे.
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
मंगळवारीही दिसली होती तेजी
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी गोल्ड फ्युचर कॉन्ट्रॅक्ट १,३०,१०७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या स्तरावर पोहोचला. यात काल ०.११ टक्के तेजी दिसून आली. सिल्व्हर मार्च फ्युचर्स ३.४८ टक्के तेजीसह १८८०६४ रुपये प्रति किलोग्रामच्या स्तरावर पोहोचले. यूएस फेडच्या निर्णयापूर्वी सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी दिसून आली आहे. चांदीच्या तेजीनं वाढणाऱ्या दरानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. केवळ १२ सत्रांमध्ये चांदीचा दर ५० डॉलर्स प्रति औंसवरून ६० डॉलर्स प्रति औंसच्या पुढे पोहोचला.
गुंतवणूक करणं योग्य राहील का?
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चांदीच्या व्यापारावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचं मत आहे की १८५५०० रुपयांच्या आसपास खरेदी करणं योग्य राहील. चांदीचा दर १.९० लाख रुपये ते १.९४ लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकतो. तज्ज्ञांनुसार, फिजिकल डिमांड आणि औद्योगिक धातूंच्या बुलिश सेंटिमेंटमुळे चांदीच्या किमतीत तेजी दिसून आली आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ४२०० डॉलर्स प्रति औंसच्या आसपास सपोर्ट बनवत आहे. गुंतवणूकदार सध्या फेड रिझर्व्हच्या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत, जिथे २५ बीपीएसच्या दर कपातीची अपेक्षा केली जात आहे.
