Gold Silver Price 28 Nov : सराफा बाजारात आज, शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढले. एकाच दिवसात चांदीचा भाव १६१९ रुपयांनी वाढला, तर सोनं ६०९ रुपयांनी महाग झालं. २४ कॅरेट सोनं आज ६०९ रुपयांनी महाग होऊन १२६६६६ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडलं. जीएसटीसह १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १३०४६५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
तर आज चांदी १६१९ रुपयांनी वाढून १६४२८६ रुपये प्रति किलो दरानं उघडली. जीएसटीसह चांदीचा भाव १६९२१४ रुपये प्रति किलो झाला आहे. गुरुवारी चांदी जीएसटी वगळता १६२६६७ रुपये प्रति किलो आणि सोनं जीएसटी वगळता १२६०५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.
संपत्ती लपवणाऱ्यांना आयकर विभागाचा दंडुका; विदेशी संपत्ती लपवणारे २५ हजार करदाते ‘रडार’वर
कॅरेटनुसार सोन्याचे दर
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ६०७ रुपयांनी महाग होऊन १२६१५९ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १२९९४३ रुपये झाली आहे. (यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही).
२२ कॅरेट सोन्याची किंमत ५५८ रुपयांनी वाढून ११६०२६ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली. जीएसटीसह हा दर ११९५०६ रुपये झालाय.
१८ कॅरेट सोने ४५८ रुपयांच्या तेजीसह ९५००० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचलं आणि जीएसटीसह याची किंमत ९७८५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
१४ कॅरेट सोन्याचा दर ३५७ रुपयांनी कमी झाला असून तो आज ७४१०० रुपये वर उघडला आणि जीएसटीसह तो ७६३२३ रुपये झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दिवसातून दोनदा म्हणजेच दुपारी १२ च्या सुमारास आणि सायंकाळी ५ च्या आसपास दर जारी करते.
