SBI vs PNB vs Canara Bank Investment: आपली कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यावर चांगला परतावा मिळवण्यासाठी आजही भारतात फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. पण जेव्हा बँक निवडण्याची वेळ येते, तेव्हा देशातील मोठ्या सरकारी बँकांपैकी कोणती बँक सर्वाधिक फायदा मिळवून देईल, याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. आज आपण देशातील ३ मोठ्या सरकारी बँकांबाबत चर्चा करणार आहोत आणि १ लाख रुपयांच्या FD वर कोणत्या बँकेत सर्वाधिक व्याज मिळेल, हे जाणून घेणार आहोत.
कॅनरा बँक (Canara Bank)
कॅनरा बँक ५५५ दिवसांच्या विशेष FD योजनेवर आकर्षक व्याज देत आहे. यामध्ये सामान्य ग्राहकांना ६.५०%, ज्येष्ठ नागरिकांना ७.००% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (८०+) ७.१०% व्याज मिळत आहे. जर ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीनं ५ वर्षांसाठी १ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर त्याला सुमारे १,३८,०४२ रुपये मिळतील, ज्यामध्ये ३८,०४२ रुपयांच्या व्याजाचा समावेश असेल. तसंच ज्येष्ठ नागरिकांना १,४१,४७८ रुपये मिळू शकतात, ज्यामध्ये ४१,४७८ रुपये व्याज असेल.
सिंगापुरच्या कंपनीनं बंगळुरूत ₹८५२ कोटींना विकली ऑफिसची बिल्डिंग; ८ वर्षांत ४ पटींपेक्षा अधिक नफा
भारतीय स्टेट बँक (SBI)
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI देखील जबरदस्त व्याज देत आहे. ५ वर्षांच्या FD वर सामान्य नागरिकांना ६.०५%, ज्येष्ठ नागरिकांना ७.०५% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.१५% निश्चित व्याज दिलं जात आहे. जर एखाद्या अति ज्येष्ठ नागरिकानं ५ वर्षांसाठी १ लाख रुपये जमा केले, तर त्याला मॅच्युरिटीवर सुमारे १,४२,५२४ रुपये मिळतील. म्हणजेच ४२,५२४ रुपयांचे व्याज मिळेल, जे या तुलनेत सर्वाधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुमारे ४१,८२६ रुपये आणि सामान्य नागरिकांना सुमारे ३५,०१८ रुपये व्याज मिळू शकतं.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) ४४४ दिवसांच्या विशेष FD वर चांगले व्याजदर दिले आहेत. सामान्य ग्राहकाला ६.६०%, ज्येष्ठ नागरिकाला ७.१०% आणि अति ज्येष्ठ नागरिकाला ७.४०% व्याजदर मिळत आहे. ५ वर्षांसाठी १ लाख रुपये जमा केल्यास सामान्य ग्राहकाला सुमारे ३८,७२३ रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळू शकतं. ज्येष्ठ नागरिकांना सुमारे ४२,१७५ रुपये आणि अति ज्येष्ठ नागरिकांना सुमारे ४४,२८५ रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक व्याज?
जर दीर्घकालीन म्हणजेच ५ वर्षांच्या FD चा विचार केला, तर SBI अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक परतावा देत आहे. तर ५५५ दिवसांच्या FD साठी कॅनरा बँक हा चांगला पर्याय आहे. PNB कमी कालावधीसाठी अधिक चांगले व्याज देत आहे, परंतु एकूण व्याजाची रक्कम कालावधीनुसार कमी राहील.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
