Lokmat Money >गुंतवणूक > सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?

सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?

Investment Tips : 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे की सोने, चांदी आणि बिटकॉइन सारख्या मालमत्तेत लवकरच मोठी घसरण होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 14:22 IST2025-07-22T14:12:11+5:302025-07-22T14:22:25+5:30

Investment Tips : 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे की सोने, चांदी आणि बिटकॉइन सारख्या मालमत्तेत लवकरच मोठी घसरण होऊ शकते.

Robert Kiyosaki Predicts Gold, Silver, and Bitcoin Bubble Burst A Buying Opportunity? | सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?

सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?

Investment Tips : 'रिच डॅड पुअर डॅड' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि वित्त जगात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, ते रॉबर्ट कियोसाकी. वयाच्या ७८ व्या वर्षीही ते मोठ्या भविष्यवाण्या करत आहेत. यावेळी त्यांची भविष्यवाणी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कियोसाकींच्या मते, सोने आणि चांदी यांसारख्या प्रमुख वस्तू तसेच बिटकॉइन लवकरच मोठ्या प्रमाणात घसरू शकतात. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही सावधगिरी बाळगण्याची वेळ असू शकते.

कियोसाकी कशात गुंतवणूक करणार?
रॉबर्ट कियोसाकींनी नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी लिहिले की, 'आता बुडबुडे फुटणार आहेत' आणि ही 'चांगली बातमी' आहे असंही ते म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केलं, "जेव्हा बुडबुडे फुटतात, तेव्हा सोने, चांदी आणि बिटकॉइन देखील घसरण्याची शक्यता असते."

कियोसाकींचा असा विश्वास आहे की, जर त्यांच्या किमती खाली आल्या, तर ते स्वतः सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करतील. त्यांनी यापूर्वीही या मालमत्ता गुंतवणुकीसाठी योग्य असल्याचे म्हटले आहे. कियोसाकींच्या मते, गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे बाजारात भीती असते आणि किमती घसरतात. म्हणूनच ते घसरणीच्या काळात या मालमत्ता खरेदी करण्याबद्दल बोलत आहेत. केवळ कियोसाकीच नाही, तर अनेक अनुभवी गुंतवणूकदार मानतात की जेव्हा बाजार खाली असतो, तेव्हा कमी किमतीत चांगली मालमत्ता खरेदी करावी जेणेकरून भविष्यात चांगला परतावा मिळू शकेल.

'रिच डॅड'चा नियम आणि 'बनावट डॉलर'चा इशारा
रॉबर्ट कियोसाकींनी त्यांचे 'रिच डॅड'ज रूल' हे पुस्तक दुसऱ्या पोस्टमध्ये शेअर केले. त्यांनी म्हटलं की, 'बचत करणारे लोक पराभूत होतात' म्हणजेच जे फक्त पैसे बँकेत साठवून ठेवतात ते हरतात. कियोसाकींचा विश्वास आहे की 'फियाट मनी' म्हणजेच सरकारने छापलेल्या नोटा (उदा. डॉलर) ही खरी मालमत्ता नाही. त्यांच्या मते, जेव्हा जेव्हा अमेरिकन सरकार आर्थिक अडचणीत येते, तेव्हा ते नोटा छापून ती समस्या सोडवते.

कियोसाकींनी अनेक उदाहरणे दिली

  • १९८७ मध्ये बाजार कोसळला? बनावट डॉलर्स छापले गेले.
  • १९९८ मध्ये एलटीसीएम (LTCM) संकट? पुन्हा नोटा छापल्या गेल्या.
  • २०१९ मध्ये रेपो मार्केट संकट, २०२० मध्ये कोविड-१९ आणि नंतर सिलिकॉन व्हॅली बँक कोसळली - प्रत्येक वेळी सरकारने फक्त नोटा छापल्या.

कियोसाकींनी स्पष्टपणे सांगितलं, "ही काही नवीन समस्या नाही... ही तीच जुनी चूक आहे जी दरवेळी मोठी होत चालली आहे." त्यांनी इशारा दिला की, 'इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक संकट लवकरच येणार आहे.' म्हणूनच त्यांनी लोकांना बनावट डॉलर्सची बचत करणे थांबवून सोने, चांदी आणि बिटकॉइनसारख्या वास्तविक मालमत्तेत गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी असे सांगितले. कियोसाकींनी अमेरिकेला जगातील सर्वात कर्जबाजारी देश म्हटले आणि यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हला जबाबदार धरले.

वाचा - फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?

वॉरेन बफेही पडझडीची वाट पाहत आहेत!
सोने, चांदी आणि बिटकॉइनबाबत रॉबर्ट कियोसाकी यांची ही पोस्ट काही दिवसांपूर्वी त्यांनी बिटकॉइनच्या नवीन विक्रमी उच्चांकावर आनंद व्यक्त केल्यानंतर आली आहे. यासोबतच त्यांनी प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांचे उदाहरण दिले. कियोसाकींच्या मते, 'वॉरेन बफेट यांनी आपले सर्व स्टॉक विकले आहेत आणि ३५० अब्ज डॉलर्स रोख स्वरूपात ठेवले आहेत.' त्यांच्या मते, बफेट सध्या जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून ते स्वस्त दरात सर्वोत्तम मालमत्ता खरेदी करू शकतील. कियोसाकींच्या या भविष्यवाणीकडे गुंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Robert Kiyosaki Predicts Gold, Silver, and Bitcoin Bubble Burst A Buying Opportunity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.