Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > 'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र

'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र

Robert Kiyosaki Prediction : "रिच डॅड, पुअर डॅड"चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही श्रीमंत कसे राहायचे याबद्दल सल्ला दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:04 IST2025-12-22T13:03:39+5:302025-12-22T13:04:11+5:30

Robert Kiyosaki Prediction : "रिच डॅड, पुअर डॅड"चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही श्रीमंत कसे राहायचे याबद्दल सल्ला दिला.

Robert Kiyosaki Prediction Silver to Hit $200 Per Ounce by 2026 Amid Global Crash | 'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र

'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र

Robert Kiyosaki Prediction : व्यापार युद्ध आणि भू-राजकीय तणाव यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर सध्या मंदीचे सावट आहे. यातून अनेक देशातील अर्थव्यवस्था कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत गुंतवणूकदार श्रीमंत राहू शकतात, असा विश्वास 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात केवळ बचत करून चालणार नाही, तर सोने, चांदी आणि क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे हाच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'चांदी' घेणार मोठी झेप!
कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये चांदीच्या भविष्याबाबत अत्यंत सकारात्मक भाकीत वर्तवले आहे. कियोसाकी यांच्या मते, २०२६ पर्यंत चांदीचे दर २०० डॉलर्स प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात. जेव्हा कागदी चलन किंवा 'फेक इकॉनॉमी' कोसळते, तेव्हा चांदी हा एकमेव असा धातू आहे जो गुंतवणूकदारांना आधार देऊन त्यांची श्रीमंती टिकवून ठेवतो. उद्योगांमधील वाढती गरज आणि तुलनेत कमी असलेला पुरवठा यामुळे चांदीचे भाव लवकरच गगनाला भिडतील, असा त्यांचा दावा आहे.

'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा!
कियोसाकी यांनी गरीब आणि श्रीमंत मानसिकतेमधील फरक स्पष्ट करताना गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला आहे. "गरीब व्यक्ती नेहमी म्हणते की, 'मी हे विकत घेऊ शकत नाही.' अशी विचारसरणी माणसाला कायम गरीब ठेवते. त्याऐवजी, 'मी हे कसे विकत घेऊ शकेन?' असा प्रश्न स्वतःला विचारा. यामुळे तुमचे डोके चालण्यास सुरुवात होते, कमाई वाढवण्याचे नवीन मार्ग सापडतात आणि तुमची बुद्धिमत्ता विकसित होते."

कियोसाकी यांचा 'गुंतवणूक मंत्र'
रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये खालील मालमत्तांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

  • सोने आणि चांदी : या मौल्यवान धातूंना ते 'देवाचे पैसे' मानतात.
  • बिटकॉइन आणि इथिरियम : डिजिटल क्रांतीच्या काळात क्रिप्टो करन्सी हा एक मजबूत पर्याय असल्याचे त्यांचे मत आहे.
  • फेडचा धोका : अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे महागाई वाढत असून कागदी चलनाची किंमत कमी होत आहे, त्यापासून वाचण्यासाठी वरील गुंतवणूक गरजेची आहे.

चांदीचा भारतीय बाजारातील विक्रम
कियोसाकी यांनी याआधीही चांदी २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल असे म्हटले होते, जे आता खरे ठरताना दिसत आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत चांदी २,१३,००० रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे या दरात आणखी मोठी वाढ अपेक्षित आहे.

वाचा - कर्जदारांसाठी 'अच्छे दिन'! फेब्रुवारीत पुन्हा कर्ज स्वस्त होण्याची शक्यता; रेपो रेट ५ टक्क्यांवर येणार?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : कियोसाकी का धन मंत्र: 'मैं इसे नहीं खरीद सकता' कहना छोड़ो!

Web Summary : रॉबर्ट कियोसाकी आर्थिक अनिश्चितता के बीच सोना, चांदी और क्रिप्टो में निवेश करने की सलाह देते हैं। उनका अनुमान है कि 2026 तक चांदी 200 डॉलर तक पहुंच सकती है। 'मैं इसे नहीं खरीद सकता' कहने के बजाय, 'मैं इसे कैसे खरीद सकता हूं?' पूछें ताकि वित्तीय बुद्धि बढ़े।

Web Title : Kiyosaki's wealth mantra: Stop saying 'I can't afford it!'

Web Summary : Robert Kiyosaki advises investing in gold, silver, and crypto amid economic uncertainty. He predicts silver could reach $200 by 2026. Instead of saying 'I can't afford it,' ask 'How can I afford it?' to boost financial intelligence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.