Lokmat Money >गुंतवणूक > वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा

वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा

Retirement Planning : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, लोकांनी लवकरात लवकर त्यांचे निवृत्ती नियोजन सुरू करणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:34 IST2025-09-05T12:34:05+5:302025-09-05T12:34:52+5:30

Retirement Planning : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, लोकांनी लवकरात लवकर त्यांचे निवृत्ती नियोजन सुरू करणे आवश्यक आहे.

Retirement Planning Guide 4 Tips to Build a Large Fund | वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा

वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा

Retirement Planning : आजच्या काळात निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित करणे हे एक मोठे आव्हान आहे. अनेक लोक निवृत्तीचे नियोजन फारसे महत्त्वाचे मानत नाहीत, पण भविष्यातील वाढती महागाई पाहता, हे नियोजन लवकरात लवकर सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही युवा आहात आणि कमावते आहात, तर तुमच्यासाठी ३० वर्षांच्या आतच निवृत्तीचे नियोजन करणे योग्य राहील. दुसरीकडे आता ६० वयाच्या वर्षांपर्यंत काम करण्याचा काळ गेला असून लवकर निवृत्त होण्याकडेही तरुणांचा कल वाढत आहे. तुम्हीही यापैकीच एक असेल तर आत्तापासूनच नियोजन सुरू करा.

आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या निवृत्तीसाठी एक चांगला आणि मोठा निधी जमा करू शकता.

महागाईचा विचार करून गुंतवणूक करा
निवृत्तीच्या नियोजनासाठी फक्त गुंतवणूक करणे पुरेसे नाही. तुम्ही अशी गुंतवणूक निवडली पाहिजे, जी महागाईला मागे टाकत चांगला परतावा देईल. उदाहरणार्थ, जर महागाई दरवर्षी ५% वाढत असेल, तर तुमच्या गुंतवणुकीवर त्यापेक्षा जास्त परतावा मिळणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी महागाईच्या दराप्रमाणे वाढवावी लागेल.

दीर्घ काळासाठी गुंतवणूक आवश्यक
निवृत्तीच्या नियोजनासाठी बचत खाते किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करणे पुरेसे नाही. यासाठी जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा. इक्विटी म्युच्युअल फंड्स, नॅशनल पेन्शन सिस्टम आणि पीएफ अकाउंट हे दीर्घकाळासाठी चांगले पर्याय आहेत. येथे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो, ज्यामुळे तुमचा पैसा वेगाने वाढतो.

एसआयपी सर्वोत्तम पर्याय
तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता. पण यामध्ये स्टेप-अप एसआयपीचा पर्याय निवडा. म्हणजेच, तुम्ही दरवर्षी तुमच्या मासिक एसआयपीच्या रकमेत १०% वाढ करत रहा. यामुळे कमी काळात मोठा निधी जमा होण्यास मदत होते.

वाचा - केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! २० वर्षांच्या सेवेनंतर मिळणार पूर्ण पेन्शन; सरकारचा मोठा निर्णय

आरोग्य विमा घ्या
आरोग्य विम्याला अनावश्यक खर्च मानू नका. कारण अनेकदा मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी लाखो रुपये कमी पडतात. निवृत्तीनंतर उत्पन्नाचा कोणताही नियमित स्त्रोत नसतो, अशा वेळी अचानक येणारा मोठा वैद्यकीय खर्च तुमच्या सर्व बचतीवर पाणी फेरू शकतो. त्यामुळे, आरोग्य विमा जरूर घ्या. हा तुमच्या निवृत्ती निधीचे संरक्षण करतो.

Web Title: Retirement Planning Guide 4 Tips to Build a Large Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.