Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > PPF मधून १ कोटींचा फंड अन् आयुष्यभर ६१,५०० ची मासिक पेन्शन, जाणून घ्या ‘सिक्रेट फॉर्म्युला’

PPF मधून १ कोटींचा फंड अन् आयुष्यभर ६१,५०० ची मासिक पेन्शन, जाणून घ्या ‘सिक्रेट फॉर्म्युला’

शिस्तबद्ध गुंतवणूक अन् संयम ठेवल्यास पीपीएफच्या माध्यमातून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड तयार करता येऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:03 IST2026-02-21T12:02:19+5:302026-02-21T12:03:05+5:30

शिस्तबद्ध गुंतवणूक अन् संयम ठेवल्यास पीपीएफच्या माध्यमातून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड तयार करता येऊ शकतो.

Retirement Fund: Fund of Rs 1 crore from PPF and monthly pension of Rs 61,500 for life, know the ‘secret formula’ | PPF मधून १ कोटींचा फंड अन् आयुष्यभर ६१,५०० ची मासिक पेन्शन, जाणून घ्या ‘सिक्रेट फॉर्म्युला’

PPF मधून १ कोटींचा फंड अन् आयुष्यभर ६१,५०० ची मासिक पेन्शन, जाणून घ्या ‘सिक्रेट फॉर्म्युला’

Retirement Fund: रिटायरमेंट प्लॅनिंग काळाजी गरज आहे. प्रत्येकाने आपल्या तरुणपणी बचत सुरू केली पाहिजे, जेणेकरुन आयुष्याच्या उत्तरार्धात चांगले आयुष्य जगता येते. यासाठी पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) हा एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय पर्याय ठरतो. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन संयम ठेवल्यास, पीपीएफच्या माध्यमातून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रिटायरमेंट कॉर्पस तयार करता येऊ शकतो आणि त्यावरून दरमहा सुमारे ६१,५०० रुपयांचे व्याजही मिळू शकते.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

PPF का ठरतो प्रभावी रिटायरमेंट पर्याय?

पीपीएफ ही सरकार समर्थित दीर्घकालीन बचत योजना आहे. त्यामुळे ती देशातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानली जाते. जुन्या करप्रणालीत पीपीएफमधील गुंतवणूक सेक्शन 80C अंतर्गत करसवलतीस पात्र ठरते. तसेच, पीपीएफवरील व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के वार्षिक व्याजदर लागू आहे. सरकार दर तिमाहीत या दराचा आढावा घेते. पूर्वीच्या दशकांत दुहेरी अंकात असलेले व्याजदर आता कमी झाले असले, तरी ७.१ टक्के करमुक्त परतावा हा कंझर्व्हेटिव्ह गुंतवणूकदारांसाठी आजही आकर्षक आहे.

पीपीएफचे महत्त्वाचे नियम

किमान गुंतवणूक: दरवर्षी ५०० रुपये

कमाल गुंतवणूक: दरवर्षी १.५ लाख रुपये

लॉक-इन कालावधी: १५ वर्षे

एक्स्टेन्शन: ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये अमर्याद वेळा

१५ वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर, योगदान सुरू ठेवायचे असल्यास मॅच्युरिटीच्या एका वर्षाच्या आत फॉर्म H सादर करणे आवश्यक आहे. पीपीएफवरील व्याज दरमहा (प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेनंतरच्या किमान शिल्लक रकमेवर) मोजले जाते, मात्र ते वर्षअखेरीस खात्यात जमा होते.

पीपीएफमधून १ कोटी रुपयांचा फंड कसा तयार होतो?

जर एखादा गुंतवणूकदार दरवर्षी पीपीएफमध्ये कमाल १.५ लाख रुपये गुंतवत राहिला आणि सरासरी ७ .१ टक्के व्याजदर गृहित धरले, तर दीर्घकालीन कंपाउंडिंगमुळे खालीलप्रमाणे कॉर्पस तयार होऊ शकतो:

१५ वर्षांनंतर: सुमारे ४०.६८ लाख रुपये

२० वर्षांनंतर (पहिला ४ वर्षांचा एक्स्टेन्शन): सुमारे ६६.५८ लाख रुपये

२५ वर्षांनंतर (दुसरा ५ वर्षांचा एक्स्टेन्शन): सुमारे १.०४ कोटी रुपये

म्हणजेच, १ कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी पीपीएफमध्ये २५ वर्षे सातत्याने गुंतवणूक करणे आवश्यक ठरते.

दरमहा ६१,५०० रुपयांचे उत्पन्न कसे?

२५ वर्षांनंतर गुंतवणूक थांबवून केवळ जमा झालेला कॉर्पस पीपीएफमध्येच ठेवला, तर...

एकूण कॉर्पस: १.०४ कोटी रुपये

वार्षिक व्याज (७.१%): सुमारे ७.३८ लाख रुपये

मासिक उत्पन्न: अंदाजे ६१,५०० रुपये

ही रक्कम मासिक ‘पेन्शन’सारखी वापरता येऊ शकते, आणि मूळ भांडवल अबाधित राहते.

रिटायरमेंटसाठी ही रणनीती का उपयुक्त?

भांडवलाची सुरक्षा: सरकारची हमी

नियमित उत्पन्न: केवळ व्याजावर आधारित

करमुक्त परतावा: कोणताही करभार नाही

कंपाउंडिंगचा फायदा: दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे मोठा परिणाम

विशेषतः रिटायरमेंटजवळ असलेले आणि इक्विटीमध्ये जोखीम घेऊ न इच्छिणारे गुंतवणूकदार पीपीएफकडे स्थिर उत्पन्नाचा आधार म्हणून पाहू शकतात.

बँक की, पोस्ट ऑफिस - पीपीएफ कुठे उघडावे?

पीपीएफ खाते बँक किंवा पोस्ट ऑफिस, दोन्ही ठिकाणी उघडता येते. नियम आणि परतावा दोन्हीकडे समानच असतो. ऑनलाइन सुविधा आणि डिजिटल व्यवहार हवे असतील तर बँक योग्य राहील. ग्रामीण भागात राहणारे किंवा प्रत्यक्ष शाखेचा वापर करणारे गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस निवडू शकतात.

गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा

वार्षिक १.५ लाख रुपयांची मर्यादा ओलांडता येत नाही.

२५ वर्षांचा कालावधी असल्याने शिस्त आणि संयम आवश्यक.

व्याजदर भविष्यात बदलू शकतात.

महागाईचा परिणाम लक्षात घ्यावा. आजची ६१,५०० रुपयांची किंमत २५ वर्षांनंतर तितकीच राहीलच असे नाही.

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title : पीपीएफ: 1 करोड़ पाएं और ₹61,500 मासिक पेंशन प्राप्त करें।

Web Summary : पीपीएफ सेवानिवृत्ति के लिए एक सुरक्षित, दीर्घकालिक निवेश है। 25 वर्षों तक सालाना ₹1.5 लाख का लगातार निवेश ₹1 करोड़ दे सकता है, जिससे ब्याज के माध्यम से लगभग ₹61,500 मासिक पेंशन मिलती है। यह कर-मुक्त और सरकार समर्थित है।

Web Title : PPF: Invest to get ₹1 crore & ₹61,500 monthly pension.

Web Summary : PPF offers a safe, long-term investment for retirement. Consistent investment of ₹1.5 lakh annually for 25 years can yield ₹1 crore, providing approximately ₹61,500 monthly pension through interest. It's tax-free and government-backed.