Lokmat Money >गुंतवणूक > आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 7 टक्के दराने वाढणार; RBI चा दावा...

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 7 टक्के दराने वाढणार; RBI चा दावा...

RBI Annual Report: रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:27 PM2024-05-30T16:27:26+5:302024-05-30T16:28:51+5:30

RBI Annual Report: रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

RBI Annual Report: India's GDP to grow at 7 percent in FY 2024-25; RBI claims | आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 7 टक्के दराने वाढणार; RBI चा दावा...

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 7 टक्के दराने वाढणार; RBI चा दावा...

RBI Growth Projection: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतीयअर्थव्यवस्था 7 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. RBI ने आज आपल्या वार्षिक अहवालात म्हटले की, 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने आव्हाने असतानाही लवचिकता दाखवली. प्रतिकूल परिस्थिती असूनही, सरकारी गुंतवणूक आणि कंझ्यूमर ऑप्टिमिझममुळे आउटलुक पॉझिटिव्ह बनला आहे.

RBI ने काय म्हटले?
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल 2023 ते मार्च 2024) मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मजबूत गतीने वाढली, त्यामुळे GDP वाढीचा दर 7.6 टक्क्यांनी वाढला आहे. 2022-23 मध्ये हा 7.0 टक्के होता. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी हा सात टक्के किंवा त्याहून अधिक राहिला आहे. आरबीआयने म्हटले की, "2024-25 साठी जीडीपी वाढीचा दर 7.0 टक्के असण्याचा अंदाज आहे. यातील जोखीम दोन्ही बाजूंनी समान प्रमाणात संतुलित असेल."

RBI अहवालात MSP च्या फायद्यांची माहिती
2023-24 या आर्थिक वर्षातील खरीप आणि रब्बी, या दोन्ही हंगामात किमान आधारभूत किंमत (MSP) ने सर्व पिकांच्या उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा निश्चित केला आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, 31 मार्च 2024 पर्यंत अन्नधान्याचा एकूण सार्वजनिक साठा हा एकूण तिमाही स्टोरेज मानकाच्या 2.9 पट होता. 2023-24 या आर्थिक वर्षात खरीप पिकांसाठी MSP मध्ये 5.3-10.4 टक्के आणि रब्बी पिकांसाठी 2.0-7.1 टक्के वाढ करण्यात आली आहे.

Web Title: RBI Annual Report: India's GDP to grow at 7 percent in FY 2024-25; RBI claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.