Gold Silver Price Today 2 January: नव्या वर्षात सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. आज, गुरुवार, २ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव सरासरी १८६ रुपयांनी वाढून ७६,७६९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीच्या दरात आज प्रति किलो ८५२ रुपयांनी वाढ झाली आहे. आज चांदीचा दर सरासरी ८६,९०७ रुपये प्रति किलो होता. आयबीजेएनं हा दर जाहीर केला आहे, ज्यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.
सोन्याचे दर आपल्या ऑल टाईम हायपेक्षा केवळ २९१२ रुपये आणि चांदी ११४३३ रुपयांनी स्वस्त आहे. ३० ऑक्टोबर रोजी सोनं ७९६८१ रुपये प्रति १० ग्राम आणि चांदी ९८,३४० रुपये प्रति किलो इतकी होती.
आज २३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव १८६ रुपयांनी वाढून ७६,४६२ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १७० रुपयांनी वाढून ७०,३२० रुपये झालाय. १८ कॅरेट सोन्याचा भाव आता १४३ रुपयांनी वाढून ५७,५७७ रुपये झालाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १०८ रुपयांनी वाढून ४४,९१० रुपये झाला.