Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा

सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा

PPF Investment: जर तुम्ही दीर्घकाळासाठी सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच PPF ही एक उत्कृष्ट योजना ठरू शकते. नियमितपणे दरमहा ११,००० रुपये गुंतवल्यास ही योजना तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा देते आणि काळानुसार मोठा निधी तयार करण्यास मदत करते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:47 IST2026-04-06T09:43:44+5:302026-04-06T09:47:12+5:30

PPF Investment: जर तुम्ही दीर्घकाळासाठी सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच PPF ही एक उत्कृष्ट योजना ठरू शकते. नियमितपणे दरमहा ११,००० रुपये गुंतवल्यास ही योजना तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा देते आणि काळानुसार मोठा निधी तयार करण्यास मदत करते.

PPF is a great option for safe and tax free investment Get more return on an investment of Rs 11000 per month | सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा

सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा

PPF Investment: जर तुम्ही दीर्घकाळासाठी सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच PPF ही एक उत्कृष्ट योजना ठरू शकते. नियमितपणे दरमहा ११,००० रुपये गुंतवल्यास ही योजना तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा देते आणि काळानुसार मोठा निधी तयार करण्यास मदत करते. १५ वर्षांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकूण किती परतावा मिळेल, हे आपण सोप्या कॅल्क्युलेशनद्वारे समजून घेऊया.

पीपीएफवर किती व्याज मिळतंय?

एप्रिल २०२६ च्या आकडेवारीनुसार, PPF चा सध्याचा व्याजदर ७.१% प्रति वर्ष इतका आहे. या दराची दर तिमाहीला सरकारद्वारे समीक्षा केली जाते आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा दर स्थिर आहे. व्याजाची गणना दरवर्षी चक्रवाढ पद्धतीनं केली जाते, परंतु दरमहा खात्यातील किमान शिलकीवर (५ तारखेपासून महिन्याच्या अखेरीपर्यंत) ते मोजलं जातं आणि ३१ मार्च रोजी खात्यात जमा केलं जातं.

कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट

दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवरील परताव्याचे गणित

  • एकूण जमा रक्कम (एकूण गुंतवणूक) : ११,००० × १२ × १५ = ₹१९,८०,०००
  • एकूण व्याज (मिळालेला परतावा) : ७.१% व्याजदरानुसार तुम्हाला एकूण व्याज सुमारे ₹१४,९१,२४८ मिळेल.
  • मॅच्युरिटी रक्कम : तुमची एकूण गुंतवणूक आणि व्याजाचा परतावा मिळून १५ वर्षांनंतर सुमारे ₹३४,७१,२४८ इतका निधी तयार होईल.

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम योजना

PPF योजना दीर्घकाळासाठी (१५ वर्षांचा लॉक-इन कालावधी, जो नंतर ५-५ वर्षांच्या ब्लॉकनुसार वाढवता येतो) अत्यंत फायदेशीर आहे. निवृत्तीचं नियोजन, मुलांचं शिक्षण किंवा लग्न अशा मोठ्या उद्दिष्टांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बाजारपेठेतील चढ-उतारांपासून पूर्णपणे सुरक्षित राहून यात करमुक्त परतावा मिळतो. जर तुम्ही प्रत्येक वर्षाच्या एप्रिलच्या सुरुवातीलाच संपूर्ण वर्षाचं योगदान जमा केले, तर तुम्हाला थोडं अधिक व्याज मिळू शकतं.

पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडातील गुंतवणूक ही “Exempt, Exempt, Exempt (EEE)” श्रेणीतील गुंतवणूक मानली जाते. याचा अर्थ यात गुंतवणूक केल्यावर तीन वेगवेगळ्या स्तरांवर कर सवलत मिळते:

१. गुंतवणुकीवर सवलत : PPF मध्ये केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वजावटीसाठी पात्र असते. जुन्या कर प्रणालीनुसार, तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ₹१.५० लाखांपर्यंत सवलतीचा लाभ घेऊ शकता.

२. व्याजावर सवलत : PPF खात्यावर मिळणारं व्याज पूर्णपणे करमुक्त असतं. म्हणजेच त्यावर कोणताही आयकर भरावा लागत नाही.

३. मॅच्युरिटीवर सवलत : मॅच्युरिटीच्या वेळी मिळणारी संपूर्ण रक्कम (गुंतवणूक + व्याज) पूर्णपणे करमुक्त असते.

Web Title : पीपीएफ: सुरक्षित, कर-मुक्त निवेश; हर महीने जमा पर शानदार रिटर्न।

Web Summary : पीपीएफ 7.1% ब्याज के साथ सुरक्षित, कर-मुक्त रिटर्न प्रदान करता है। मासिक ₹11,000 का निवेश 15 वर्षों के बाद लगभग ₹34,71,248 का लाभ देता है। यह धारा 80C के तहत EEE लाभों के लिए योग्य है।

Web Title : PPF: Secure, tax-free investment option yielding high returns with monthly deposits.

Web Summary : PPF offers secure, tax-free returns with 7.1% interest. Monthly ₹11,000 investments yield approximately ₹34,71,248 after 15 years. It qualifies for EEE benefits under Section 80C.