Post Office Time Deposit Scheme : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यावर्षी दोनदा रेपो दरात कपात केल्यामुळे, बहुतेक बँकांनी कर्जे स्वस्त केली आहेत, पण त्याचा परिणाम म्हणून मुदत ठेवींवरील (Fixed Deposits - FD) व्याजदरही कमी झाले आहेत. अशा काळात, पोस्ट ऑफिस बचत योजना पुन्हा एकदा ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह आणि आकर्षक पर्याय म्हणून पुढे आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बँक एफडीच्या तुलनेत ती आजही चांगली सुरक्षा आणि खात्रीशीर परतावा देत आहे. त्यामुळे, जर तुम्ही सुरक्षित आणि निश्चित परताव्याच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) योजना फायदे आणि परतावा
आपण इथे स्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Time Deposit - TD) योजनेबद्दल बोलत आहोत. या योजनेत तुम्ही फक्त ३ लाख रुपये गुंतवून दोन वर्षांत ४४,६६४ रुपयांचे हमी व्याज मिळवू शकता. यामध्ये गुंतवणूक आणि व्याजाची गणना खालीलप्रमाणे केली जाते.
- १ वर्षासाठी व्याजदर: ६.९%
- २ वर्षांसाठी व्याजदर: ७.०%
- ३ वर्षांसाठी व्याजदर: ७.१%
- ५ वर्षांसाठी व्याजदर: ७.५%
यानुसार, जर तुम्ही पोस्ट ऑफिस टीडी योजनेत २ वर्षांसाठी ३ लाख रुपये जमा केले, तर दोन वर्षांनी तुम्हाला एकूण ,४४,६६४ रुपये परत मिळतील. म्हणजेच, तुमच्या ३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ४४,६६४ रुपये व्याज मिळेल. विशेष म्हणजे, हे परतावे पूर्णपणे हमी (Guaranteed) केलेले असतात.
वाचा - टाटा समूहाचा 'हा' शेअर बनला मल्टीबॅगर: ५ वर्षांत १ लाखाचे २९ लाख, गुंतवणूकदार मालामाल!
या योजनेत काय विशेष आहे?
- संपूर्ण सुरक्षा: ही एक सरकारी बचत योजना असल्यामुळे, तुमची गुंतवणूक येथे १००% सुरक्षित असते.
- समान व्याजदर: सर्व वयोगटातील गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींवर समान व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे दर नाहीत.
- किमान गुंतवणूक: तुम्ही या योजनेत किमान २०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
- सोपे ट्रान्सफर: तुमचे टाइम डिपॉझिट खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे ट्रान्सफर करता येते.
- कर सवलत: ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर आयकर कायद्याच्या कलम ८०सी (80C) अंतर्गत कर सवलत मिळते.
- वेळेपूर्वी काढण्याची सुविधा: तुम्हाला गरज पडल्यास, तुम्ही जमा केलेली रक्कम मुदतीपूर्वीही काढू शकता (काही अटी लागू).
- नामांकन सुविधा: यात नामांकन (Nomination) सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला पैसे मिळतात.
- संयुक्त खाते: टाइम डिपॉझिट खाते एकापेक्षा जास्त व्यक्ती संयुक्तपणे (Jointly) व्यवस्थापित करू शकतात.