Lokmat Money >गुंतवणूक > 5 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये मिळवण्याची संधी; पाहा पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम...

5 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये मिळवण्याची संधी; पाहा पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुमचे पैसेही सुरक्षित राहतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:51 IST2025-01-05T15:50:06+5:302025-01-05T15:51:01+5:30

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुमचे पैसेही सुरक्षित राहतील.

Post Office Scheme: Get Rs 15 lakh by investing Rs 5 lakh; See the powerful scheme of the Post Office | 5 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये मिळवण्याची संधी; पाहा पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम...

5 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये मिळवण्याची संधी; पाहा पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम...

Post Office Scheme: आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतात. मूलं मोठी झाल्यावर त्यांचे शिक्षण, लग्न इत्यादी बाबींसाठी पैसा लागतो आणि हा पैसा अचानक उभारणे शक्य नाही. यासाठी आधीपासूनच ठराविक रक्कम बाजुला काढून ठेवणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुमचे पैसे तिप्पट होऊ शकतात.

मूल जन्माला येताच काही पालक PPF, RD, Sukunya अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू लागतात. याशिवाय, काही लोक मुलाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मुदत ठेव म्हणजेच एकरकमी रक्कम जमा करण्याचा विचार करतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात 5 लाख रुपये गुंतवल्यार, तुम्हाला 15 लाख रुपये परतावा मिळेल. पोस्ट ऑफिसची ही योजना सर्वसामान्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवा
जर तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवायची असेल तर पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट, म्हणजेच पोस्ट ऑफिस FD हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 5 वर्षांच्या एफडीवर चांगले रिटर्न दिले जात आहेत. हे बँकांपेक्षा चांगले व्याज देते. या योजनेद्वारे तुम्ही तुमची रक्कम तीन पटीने वाढवू शकता. म्हणजेच, आपण 5,00,000 रुपये गुंतवल्यास, 180 महिन्यांत तुम्हाला 15,00,000 रुपये मिळू शकतात.

5 लाखांचे 15 लाख रुपये कसे होणार
5 लाखांचे 15 लाख करण्यासाठी पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा करावे लागतील. पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज दर देते. 5 वर्षानंतर मॅच्युरिटी रक्कम 7,24,974 रुपये होईल, परंतु ही रक्कम न काढता, पुन्हा 5 वर्षांसाठी जमा करायची. अशाप्रकारे, 10 वर्षांमध्ये तुम्हाला 5 लाख रुपयांच्या रकमेवर 15 लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम मिळेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, 5 लाखाचे 15 लाख रुपये करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडी दोनदा वाढ करावी लागेल. यासाठी काही नियम आहेत जे तुम्ही समजून घेतले पाहिजेत.

पोस्ट ऑफिस एफडी व्याज दर
बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही तुमच्याकडे वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीचा पर्याय आहे. प्रत्येक कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर दिले जातात. पोस्ट ऑफिसमधील सध्याचे व्याजदर खालीलप्रमाणे आहेत.

एक वर्ष 6.9% वार्षिक व्याज
दोन वर्ष 7.0% वार्षिक व्याज
तीन वर्ष 7.1% वार्षिक व्याज
पंचवार्षिक 7.5% वार्षिक व्याज

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Post Office Scheme: Get Rs 15 lakh by investing Rs 5 lakh; See the powerful scheme of the Post Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.