Post Office Savings Schemes: आज देशात गुंतवणूकीचे अनेक पर्याच उपलब्ध आहेत. कुणी बँकेतगुंतवणूक करतो, तर कुणी शेअर मार्केट अन् म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. फार कमी लोकांना माहितेय की, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देते. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यात बँकांपेक्षा जास्त व्याज मिळते. आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत.
या सरकारी योजनेवर 7.5 टक्के व्याज
या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव किसान विकास पत्र (KVP) आहे. सध्या या योजनेवर 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. किसान विकास पत्र योजनेत एकरकमी गुंतवणूक केली जाते. यामध्ये तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता, तर जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. म्हणजेच, या योजनेत तुम्ही हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही कितीही पैसे गुंतवलेत तरीही मॅच्युरिटीवर तुमचे पैसे थेट दुप्पट होतात.
मॅच्युरिटीवर पैसे दुप्पट
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुमचे पैसे 115 महिन्यांत, म्हणजे 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होतात. जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला 5 लाख रुपये व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर एकूण 10 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, जर तुम्ही या योजनेत 10 लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला 10 लाख रुपयांचे थेट व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 20 लाख रुपये मिळतील.
गुंतवणूकदारांचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहील
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही पूर्णपणे सुरक्षित योजना आहे. त्यात जमा केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि तुम्हाला हमीसह निश्चित व्याज मिळते. म्हणजेच, या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर पैसे बुडण्याची चिंता नाही.