post office scheme : सध्या शेअर बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. बहुतेक लोकांचे पोर्टफॉलीओ लाल रंगात आले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पुन्हा एकदा पारंपारिक गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहे. तुम्हीही अशाच योजनांच्या शोधात असाल आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस योजनेची माहिती घेऊन आलो आहोत. पोस्ट ऑफिसद्वारे टाइम डिपॉझिट स्कीम चालवली जाते, त्यात गुंतवणूक करून तुम्ही फक्त व्याजातून २ लाख रुपये कमवू शकता. यावर मिळमारा व्याजदर कुठल्याही बँकांपेक्षा जास्त आहे.
या योजनेत सरकार देतंय ७.५ टक्के व्याज
प्रत्येक वयोगटासाठी पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या बचत योजना चालवल्या जातात. जर आपण पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमबद्दल बोललो, तर ती मजबूत परतावा, सुरक्षित गुंतवणूक तसेच कर सवलतीचा लाभ या योजनेत मिळतो. या योजनेत पाच वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतात, तर सरकार या योजनेत गुंतवणूकदारांना ७.५ टक्के आकर्षक व्याज देत आहे, म्हणजेच ही बचत योजना परतावा देण्याच्या बाबतीतही पुढे आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत, गुंतवणूकदार वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. यामध्ये १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. एका वर्षासाठी गुंतवणुकीवर ६.९ टक्के व्याज मिळते, तर २ किंवा ३ वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास ७ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना ७.५ टक्के दराने व्याज मिळते.
व्याजातून २ लाख रुपये कसे मिळतील?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून गुंतवणूकदार केवळ व्याजातून २ लाख रुपये कमवू शकतात. त्याचं गणित आपण समजून घेऊ. वास्तविक, जर आपण मुदत ठेवींमधील व्याज उत्पन्नावर नजर टाकली तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पोस्ट ऑफिस योजनेत ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याला ७.५ टक्के दराने या कालावधीत ठेवीवर २,२४,९७४ रुपये परतावा मिळेल आणि जर आपण हे सर्व जोडले तर, मॅच्युरिटीवरील एकूण रक्कम ७९,४२४ रुपये होईल. याचा अर्थ असा की तुम्हाला केवळ व्याजातून २ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होईल.
तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळेल
टाईम डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा १९६१ च्या कलम ८०C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत एकल खाते किंवा संयुक्त खाते उघडता येते. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. यामध्ये किमान १,००० रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवलेत, त्यानुसार तुमचे व्याज उत्पन्नही वाढेल.