Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!

'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!

NPS Investment : एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्याने कर बचत, चक्रवाढीचे फायदे आणि निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:48 IST2025-11-04T16:08:31+5:302025-11-04T16:48:45+5:30

NPS Investment : एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्याने कर बचत, चक्रवाढीचे फायदे आणि निवृत्तीनंतर नियमित पेन्शन मिळते.

NPS Investment Get Dual Benefit of High Return and Tax Saving for a Tension-Free Retirement | 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!

'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!

NPS Investment : जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो, तेव्हा बहुतेक लोक म्युच्युअल फंड, सोने किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूककरण्याचा सल्ला देतात. मात्र, एक असाही गुंतवणुकीचा पर्याय आहे, जो तुम्हाला उत्कृष्ट परतावा देऊ शकतो आणि तुमची निवृत्ती पूर्णपणे चिंतामुक्त करू शकतो. आम्ही बोलत आहोत 'नॅशनल पेन्शन सिस्टम' म्हणजेच NPS बद्दल!

निवृत्तीनंतर आनंदी आणि निश्चिंत आयुष्य जगण्याची इच्छा प्रत्येकाची असते, पण ते आपोआप मिळत नाही. त्यासाठी वेळेत आणि योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ 'आशेवर' नाही, तर 'गुंतवणुकीवर' विश्वास ठेवून लवकर सुरुवात केल्यास चक्रवाढ व्याजाची जादू अनुभवता येते आणि एनपीएस हे याचे सर्वोत्तम माध्यम आहे.

दीर्घकालीन सुरक्षिततेची हमी
एनपीएस ही बचत करण्याची एक सोपी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धत आहे. यात गुंतवणूकदारांचे पैसे विविध ठिकाणी लावले जातात, जसे की शेअर्स, सरकारी रोखे आणि कॉर्पोरेट बॉण्ड्स. या गुंतवणुकीतून दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाच्या दराने परतावा मिळत राहतो, ज्यामुळे तुमचा निवृत्ती निधी वाढत जातो.

नोकरी सुरू केलेल्या तरुणापासून ते निवृत्तीच्या जवळ आलेल्या व्यक्तींपर्यंत, प्रत्येकासाठी एनपीएस एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही स्वतः योगदान देऊन किंवा तुमच्या कंपनीच्या NPS मॉडेलचा फायदा घेऊन यात नियमित गुंतवणूक करू शकता. यामुळे नियमित गुंतवणुकीची सवय लागते, जी दीर्घकालीन संपत्ती उभारणीची गुरुकिल्ली आहे.

कर बचतीचाही मिळतो दुहेरी फायदा
एनपीएसचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात जुन्या आणि नवीन अशा दोन्ही कर प्रणालींमध्ये कर बचतीचा लाभ मिळतो.

कर प्रणालीकर बचतीचे कलमबचतीचा फायदा
जुनी प्रणाली80C, 80CCD (1B), 80CCD (2)₹१.५० लाखांव्यतिरिक्त ५०,००० रुपयांची अतिरिक्त वजावट.
नवीन प्रणाली80CCD (2)कॉर्पोरेट NPS योगदानावर लाभ उपलब्ध.

निवृत्तीनंतरचे नियम
निवृत्तीनंतर एनपीएसमधून पैसे काढण्याचे नियम गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

  • करमुक्त रक्कम : निवृत्तीच्या वेळी तुम्ही तुमच्या एकूण फंडातून ६० टक्क्यांपर्यंत रक्कम एकरकमी काढू शकता आणि ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.
  • मासिक पेन्शन: उर्वरित किमान ४० टक्के रक्कम तुम्हाला 'अॅन्युइटी' खरेदी करण्यासाठी वापरावी लागते, ज्यामुळे तुम्हाला दरमहा नियमित पेन्शन मिळते.
  • एनपीएस हे आज तुमच्या कराची बचत करते आणि उद्या तुमच्या निवृत्तीचे आयुष्य सुरक्षित करते. त्यामुळे चांगला परतावा आणि सुरक्षित निवृत्तीसाठी एनपीएसमध्ये लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा.

वाचा - मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : दुगुना फायदा: सुरक्षित रिटायरमेंट के लिए NPS में निवेश करें!

Web Summary : NPS शानदार रिटर्न देता है, जिससे चिंतामुक्त रिटायरमेंट सुनिश्चित होता है। यह पुरानी और नई दोनों प्रणालियों के तहत कर लाभ प्रदान करता है और रिटायरमेंट पर 60% कर-मुक्त निकासी की अनुमति देता है। चक्रवृद्धि ब्याज का लाभ उठाने और एक बड़ा रिटायरमेंट फंड बनाने के लिए जल्दी निवेश करें।

Web Title : Double Benefit: Invest in NPS for a Secure Retirement!

Web Summary : NPS offers excellent returns, securing a worry-free retirement. It provides tax benefits under both old and new regimes and allows for a 60% tax-free withdrawal upon retirement. Invest early to enjoy the magic of compounding and build a substantial retirement fund.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.