Lokmat Money >गुंतवणूक > कर वाचवण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत आहात? हे आहेत बेस्ट ऑफ ५

कर वाचवण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत आहात? हे आहेत बेस्ट ऑफ ५

Tax Saving Investments : एनपीएसमध्ये ५० हजार रुपयांच्या योगदानावर तुम्ही अतिरिक्त कर सूट मागू शकता. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम हा आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर लाभांचा दावा करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:27 IST2025-01-21T14:24:29+5:302025-01-21T14:27:10+5:30

Tax Saving Investments : एनपीएसमध्ये ५० हजार रुपयांच्या योगदानावर तुम्ही अतिरिक्त कर सूट मागू शकता. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम हा आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर लाभांचा दावा करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे.

Looking for a good investment option to save tax? Here are the best 5 | कर वाचवण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत आहात? हे आहेत बेस्ट ऑफ ५

कर वाचवण्यासाठी चांगला गुंतवणूक पर्याय शोधत आहात? हे आहेत बेस्ट ऑफ ५

Tax Saving Investments : जसजसा मार्च महिना जवळ येतो तसतसे करदात्यांनी कर बचतीचे विविध पर्याय शोधणे सुरू केले आहे. पण, फक्त टॅक्स सेविंग स्किम शोधून उपयोग नाही. तर तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणेही आवश्यक आहे. आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर बचत पर्यायांपैकी ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम’ (ELSS) हा एक चांगला पर्याय असल्याचे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कराचा बोजा कमी करण्यासाठी, कलम ८०C अंतर्गत १.५ लाख रुपयांची बचत करण्याव्यतिरिक्त, व्यक्तीने कलम ८०D (आरोग्य विमा) आणि कलम ८०CCD अंतर्गत NPS योजनेचे फायदेही घेतले पाहिजेत.

कर बचतीसाठी कोणता पर्याय योग्य?
नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) मध्ये ५०,००० रुपयांच्या योगदानावर अतिरिक्त कर सूट मिळू शकते. एनपीएस, ईएलएसएस, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) आणि लाइफ इन्शुरन्स पॉलिसी (एलआयसी), या योजनेत तुम्ही करसवलतीचा लाभ घेऊ शकता. यामध्येही ईएलएसएस ही योजना फक्त करसवलतच नाही. तर गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावून देऊ शकते. कारण, ईएलएसएस गुंतवणूक शेअर बाजाराशी थेट जोडलेली असून इतिहास पाहिला तर सुमारे ११ ते १२ टक्के प्रतिवर्षी दीर्घकालीन परतावा देत आहे. दुसरे, ईएलएसएस अंतर्गत ‘लॉक इन पीरियड’ फक्त ३ वर्षांचा आहे. म्हणजेच तुम्ही तुमची रक्कम तीन वर्षांनी काढू शकता.

ईएलएसएस हा आकर्षक पर्याय का आहे?
या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीची रक्कम गरजेसाठी काढता येते किंवा कलम ८०C अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नवीन ELSS मध्ये पुन्हा गुंतवता येते. अशाप्रकारे, एकीकडे करबचत तर दुसरीकडे संपत्ती निर्माण करण्याची क्षमता ELSS ला एक आकर्षक पर्याय बनवते. एनएससी, पीपीएफ सारख्या उत्पादनांवरील व्याज निश्चित आहे. सरकार दर ३ महिन्यांनी ते जाहीर करते. ELSS सारख्या उत्पादनांवरील परतावा निश्चित नसतो. त्यांची कामगिरी बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असते.

कोणत्या योजनेत किती फायदा?
कर सवलत देणाऱ्या गुंतवणूक आणि बचत उत्पादनांमध्ये ELSS, PPF (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी), सुकन्या समृद्धी योजना, एनएससी, जीवन विमा इत्यादींचा समावेश आहे. PPF चा 'लॉक इन' कालावधी १५ वर्षांचा आहे, तर NSC चा 'लॉक इन' कालावधी ५ वर्षांचा आहे. त्याच वेळी, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, लॉक-इन कालावधी मुलगी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि एलआयसी मॅच्युरिटी कालावधीपर्यंत आहे. जर आपण व्याज आणि परताव्याबद्दल बोललो तर सध्या ते PPF वर ७.१ टक्के आणि NSC वर ७.७० टक्के आहे. सुकन्या समृद्धी योजनेसाठी ते ८.२ टक्के आहे. एलआयसीच्या बाबतीत ते सुमारे पाच ते सहा टक्के आहे.

NPS मधून मिळू शकते अतिरिक्त कर सूट
कलम ८०C व्यतिरिक्त कर बचतीच्या पर्यायांमध्ये करदाते एनपीएसमध्ये ५०,००० रुपयांचे योगदान देऊन कलम ८०CCD (1B) अंतर्गत अतिरिक्त कर सवलतीचा दावा करू शकतात. एनपीएस मधील गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी असली तरी त्यामध्ये संपूर्ण तरलता म्हणजेच रोख रकमेचा अभाव आहे. त्यामुळे हा पर्याय स्वीकारण्यापूर्वी त्याचे काळजीपूर्वक मूल्यांकन केले पाहिजे.

डिस्क्लेमर : यात गुंतवणुकीसाठी विविध पर्यायांची माहिती देण्यात आली आहे. हा कुठल्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Web Title: Looking for a good investment option to save tax? Here are the best 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.