LIC Jeevan Tarun : वाढती महागाई आणि शिक्षणाचा गगनाला भिडलेला खर्च यामुळे आज प्रत्येक पालकासमोर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करण्याचे मोठे आव्हान आहे. अनेकदा आर्थिक नियोजनाअभावी हुशार मुलांची स्वप्ने अपूर्ण राहतात. हीच अडचण ओळखून भारतीय जीवन विमा निगमने 'जीवन तरुण' ही विशेष विमा योजना आणली आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा देणारी ही योजना पालकांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे.
काय आहे 'जीवन तरुण' पॉलिसी?
ही एक 'नॉन-लिंक्ड' लिमिटेड प्रीमियम पेमेंट योजना आहे. याचा अर्थ असा की, यातील गुंतवणुकीवर शेअर बाजारातील चढ-उतारांचा परिणाम होत नाही, त्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. मुलांचे शिक्षण, लग्न किंवा करियरच्या सुरुवातीसाठी लागणारा मोठा निधी उभा करण्यासाठी या योजनेची आखणी करण्यात आली आहे.
१५० रुपयांच्या बचतीतून २६ लाखांचा 'मॅजिक' आकडा
मध्यमवर्गीय कुटुंबासाठी दररोज १५० रुपयांची बचत करणे फारसे कठीण नाही. याचे गणित समजून घेऊया.
- दैनिक बचत : १५० रुपये
- मासिक गुंतवणूक : ४,५०० रुपये
- वार्षिक गुंतवणूक : ५४,००० रुपये
समजा, तुमचे मूल १ वर्षाचे असताना तुम्ही ही पॉलिसी सुरू केली आणि २५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला सुमारे २६ लाख रुपये मिळू शकतात. या रकमेमध्ये विमा राशी, वार्षिक बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनसचा समावेश असतो.
पैसे परत मिळण्याचे नियम आणि अटी
- वयोमर्यादा : मुलाचे वय किमान ९० दिवस ते कमाल १२ वर्षे असावे.
- कालावधी : पॉलिसीचा कालावधी २५ वर्षे उणे मुलाचे सध्याचे वय यानुसार निश्चित केला जातो.
- मनी बॅक सुविधा : या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मूल २० वर्षांचे झाल्यापासून ते २४ वर्षांचे होईपर्यंत दरवर्षी ठराविक रक्कम 'मनी बॅक' म्हणून मिळते. महाविद्यालयीन शिक्षणाच्या फीसाठी हा पैसा अत्यंत उपयोगी पडतो. उरलेली सर्व रक्कम २५ व्या वर्षी बोनससह दिली जाते.
वाचा - सोने-चांदीच्या दरात 'पॅनिक सेलिंग'? आठवड्याभरात सोन्याचे दर ४,१०० रुपयांनी कोसळले, खरेदीची हीच संधी?
कर सवलत आणि कर्जाची सुविधा
- कलम ८०-सी : भरलेल्या प्रीमियमवर आयकरात सवलत मिळते.
- कलम १०(१०डी) : मॅच्युरिटी किंवा मृत्यूनंतर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.
- कर्ज सुविधा : आणीबाणीच्या काळात या पॉलिसीवर कर्ज घेण्याची सोयही उपलब्ध आहे.
