LIC Amrit Bal Policy : प्रत्येक पालक आपल्या कमाईतून काही बचत करून ती आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी अशा ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो, जिथे पैसे सुरक्षित राहतील आणि रिटर्नही जोरदार मिळेल. याच उद्देशाने, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी घेऊन आली आहे खास मुलांसाठीची योजना – 'एलआयसी अमृत बाल पॉलिसी'. हा प्लॅन इन्शुरन्ससोबतच दमदार रिटर्नही देतो.
'अमृत बाल पॉलिसी' काय आहे?
एलआयसी अमृत बाल ही एक नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स योजना आहे. यामध्ये पालक आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक सुरू करू शकतात. ही योजना मुलांच्या शिक्षण, विवाह किंवा इतर महत्त्वाच्या गरजांसाठी मोठा निधी जमा करण्यास मदत करते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलाचे किमान वय ३० दिवस ते कमाल १३ वर्षे इतके आहे.
यात किमान २,००,००० रुपये तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही किमान १८ वर्षे ते कमाल २५ वर्षांपर्यंत मॅच्युरिटी कालावधी निवडू शकता. प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरण्याची सोय आहे. या योजनेत सिंगल प्रीमियम (एकरकमी) आणि लिमिटेड प्रीमियम (मर्यादित वर्षांसाठी) असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
एलआयसीकडून गॅरंटीड रिटर्न!
या पॉलिसीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे एलआयसी यामध्ये गॅरंटीड रिटर्न देत आहे. पॉलिसी सुरू झाल्यापासून ते मुदत संपेपर्यंत, प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी, प्रति हजार मूळ विमा रकमेवर ८० रुपये दराने 'गॅरंटीड सम अश्योर्ड' जोडला जातो (पॉलिसी चालू असल्यास). प्रीमियम भरण्याच्या मुदतीसाठी तुम्हाला पाच, सहा आणि सात वर्षांचे पर्याय मिळतात.
फायद्याचे गणित कसे?
- समजा तुम्ही २,००,००० रुपयांच्या किमान विमा रकमेची पॉलिसी घेतली आणि प्रीमियम भरण्यासाठी ७ वर्षे निवडली.
- वार्षिक प्रीमियम: सुमारे ३०,७७५ रुपये (मासिक सुमारे ७,९०३ रुपये).
- एकूण गुंतवणूक: ७ वर्षांत एकूण सुमारे २.१५ लाख रुपये.
- गॅरंटीड ॲडिशन (जमा झालेली रक्कम): ८० प्रति हजार रुपये दराने २५ वर्षांत एकूण ३.८४ लाख (₹2,00,000 / 1000 x ₹80 x 25 वर्षे)
- मॅच्युरिटीवर मिळणारा एकूण निधी: २५ वर्षांच्या मुदतीनंतर मुलाला मिळणारा एकूण फंड ५.८४ लाख रुपये असेल.
इतर महत्त्वाचे फायदे
पॉलिसी सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा एकल प्रीमियम पॉलिसीसाठी तीन महिन्यांनंतर कर्ज सुविधा उपलब्ध होते. कर्जाची कमाल रक्कम समर्पण मूल्याच्या ९०% पर्यंत असू शकते. किमान प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी सरेंडर करता येते. ही पॉलिसी ऑनलाइन खरेदी केल्यास लिमिटेड प्रीमियम प्लॅनसाठी १०% आणि सिंगल प्रीमियम प्लॅनसाठी २% पर्यंत सूट दिली जाते.
