Lokmat Money >गुंतवणूक > जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

India Smartphone Export: भारतातील स्मार्टफोन निर्यातीने पेट्रोलियम उत्पादने आणि हिऱ्यांच्या निर्यातीलाही मागे टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 17:14 IST2025-05-18T17:11:41+5:302025-05-18T17:14:10+5:30

India Smartphone Export: भारतातील स्मार्टफोन निर्यातीने पेट्रोलियम उत्पादने आणि हिऱ्यांच्या निर्यातीलाही मागे टाकले आहे.

India Smartphone Export: 'Made in India' dominates the world; India's big leap in smartphone exports | जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...


India Smartphone Export: स्मार्टफोन निर्यातीच्या बाबतीत भारतानी मोठी कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातून 24.14 अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन्स निर्यात झाले. गेल्या वर्षीच्या 15.57 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीपेक्षा हे ५५ टक्के जास्त आहे. अलिकडेच जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, यापैकी बहुतांश स्मार्टफोन्स अमेरिका, नेदरलँड्स, इटली, जपान आणि झेक प्रजासत्ताकमध्ये पाठवण्यात आले.

एवढी निर्यात फक्त अमेरिकेत 
2024-25 या आर्थिक वर्षात भारताने एकट्या अमेरिकेला 10.6 अब्ज डॉलर्सचे स्मार्टफोन निर्यात केले. गेल्या वर्षी अमेरिकेत निर्यात झालेल्या $5.57 अब्ज किमतीपेक्षा हे दुप्पट आहे. भारतातील स्मार्टफोन निर्यातीने पेट्रोलियम उत्पादने आणि हिऱ्यांच्या निर्यातीलाही मागे टाकले आहे. याचा अर्थ असा की भारत आता पेट्रोकेमिकल्स आणि हिऱ्यांपेक्षा जास्त स्मार्टफोन निर्यात करतो.

अमेरिकेव्यतिरिक्त, नेदरलँड्सने गेल्या आर्थिक वर्षात भारतातून $2.2 अब्ज किमतीचे आयफोन आयात केले. तर, 1.26 अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन इटलीला आणि 1.17 अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन चेक रिपब्लिकला पाठवण्यात आले. टोकियोला होणारी स्मार्टफोन निर्यात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये फक्त 120 मिलियन डॉलर्स होती, जी आर्थिक वर्ष 25  मध्ये 520 मिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

सरकारच्या प्रयत्नांना यश आले
पीएलआय योजनेसह सरकारी प्रयत्नांमुळे गेल्या दोन आर्थिक वर्षांत स्मार्टफोन निर्यातीत वाढ झाली आहे. देशात अनेक स्मार्टफोन युनिट्स उघडले आहेत. यामुळे, या क्षेत्रातील भारताची पुरवठा साखळी मजबूत होत असून, अधिक गुंतवणूक आकर्षित होत आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपलसारख्या मोठ्या कंपन्याही त्यांचा उत्पादन बेस चीनमधून भारतात हलवत आहेत. उत्पादन खर्चात 5-8 टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी स्मार्टफोन उत्पादन केंद्र म्हणून भारतावर यामुळे विश्वास वाढला आहे.

Web Title: India Smartphone Export: 'Made in India' dominates the world; India's big leap in smartphone exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.