Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत

मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत

National Pension System : एनपीएस ही एक निवृत्ती बचत योजना आहे, जी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. परंतु, ठराविक कालावधीनंतर यातील बॅलन्स तपासणे महत्त्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:50 IST2025-11-17T15:52:09+5:302025-11-17T16:50:37+5:30

National Pension System : एनपीएस ही एक निवृत्ती बचत योजना आहे, जी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. परंतु, ठराविक कालावधीनंतर यातील बॅलन्स तपासणे महत्त्वाचे आहे.

How to Check NPS Balance Online and Offline Complete Guide Using PRAN, Umang App, and Missed Call | मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत

मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत

National Pension System : आपली आर्थिक स्थिती योग्य प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी बँक खाती आणि विविध गुंतवणूक योजनांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे, आपल्या नॅशनल पेन्शन सिस्टम बॅलन्स तपासणे. तुम्ही दीर्घकाळापासून एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा नुकतीच सुरुवात केली असेल, तर तुमचा बॅलन्स नियमितपणे तपासणे आवश्यक आहे. तो तुम्ही ४ वेगवेगळ्या प्रकारे तपासू शकता.

नॅशनल पेन्शन सिस्टम काय आहे?
नॅशनल पेन्शन सिस्टम ही भारत सरकारने सुरू केलेली निवृत्ती बचत योजना आहे, ज्याचा उद्देश वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे. ही एक डिफाइंड कॉन्ट्रिब्यूशन योजना आहे, ज्यात नोकरीच्या काळात नियमितपणे एनपीएस खात्यात पैसे जमा केले जातात. हे पैसे शेअर्स आणि बॉन्ड्ससारख्या बाजार-आधारित साधनांमध्ये गुंतवले जातात, ज्यामुळे वेळानुसार चांगला परतावा मिळतो. ही योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे आणि आयकर कायद्याच्या काही कलमांखाली कर सवलतीचा लाभही मिळतो. एनपीएसचे नियंत्रण PFRDA (पेंशन फंड रेग्युलेटरी ॲन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी) द्वारे केले जाते.

ऑनलाइन पद्धतीने NPS बॅलन्स कसा तपासावा?

  • NSDL च्या NPS पोर्टलवर जा.
  • तुमच्या PRAN (Permanent Retirement Account Number) आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा.
  • Transaction Statement किंवा Holding Statement सेक्शनमध्ये जाऊन तुमचा बॅलन्स तपासा.
  • उमंग ॲपद्वारे

उमंग ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.

  • तुमच्या PRAN आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करून रजिस्टर करा.
  • ॲपमध्ये तुम्ही Holdings आणि Recent Contributions पाहू शकता.

मिस्ड कॉलद्वारे NPS बॅलन्स कसा तपासावा?

  • जर तुमच्याकडे इंटरनेट उपलब्ध नसेल, तर तुम्ही मिस्ड कॉल देऊनही तुमचा बॅलन्स त्वरित मिळवू शकता.
  • तुमचा मोबाईल नंबर NSDL पोर्टलवर नोंदणीकृत असल्याची खात्री करा.
  • तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून खालीलपैकी कोणत्याही नंबरवर मिस्ड कॉल द्या:
  • 1800-210-0080
  • 9212993399
  • थोड्याच वेळात तुम्हाला SMS द्वारे तुमचा एनपीएस बॅलन्स प्राप्त होईल.

ईमेल अलर्टद्वारे बॅलन्स

  • तुम्ही वारंवार लॉगिन न करताही ईमेल नोटिफिकेशनद्वारे तुमच्या गुंतवणुकीबद्दल माहिती मिळवू शकता.
  • तुमच्या NSDL NPS खात्यात लॉगिन करा.
  • Profile Settings मध्ये जाऊन तुमचा ईमेल अपडेट करा.
  • ईमेल स्टेटमेंट आणि बॅलन्स अलर्ट Enable करा.

वाचा - क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं

महत्त्वाच्या गोष्टी
नियमितपणे तुमचा एनपीएस बॅलन्स तपासल्यास तुम्ही तुमच्या निवृत्ती योजनेला योग्य मार्गावर ठेवू शकता. निवृत्ती नियोजन फक्त दीर्घकालीन गुंतवणुकीपुरते मर्यादित नसते. एनपीएससोबत स्थिर आणि सुरक्षित परतावा देणारे पर्याय जोडून तुम्ही एक संतुलित निवृत्ती पोर्टफोलिओ तयार करू शकता.

Web Title : मोबाइल पर मिनटों में अपना NPS बैलेंस जांचें: आसान तरीके।

Web Summary : NSDL पोर्टल, उमंग ऐप या मिस्ड कॉल के माध्यम से आसानी से अपना NPS बैलेंस जांचें। वित्तीय सुरक्षा और संतुलित पोर्टफोलियो के लिए अपनी सेवानिवृत्ति बचत की नियमित निगरानी करें।

Web Title : Check your NPS balance in minutes via mobile: Easy methods.

Web Summary : Easily check your NPS balance via NSDL portal, Umang app, or missed call. Regularly monitor your retirement savings for financial security and a balanced portfolio.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.