Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Union Bank मध्ये ४०० दिवसांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केल्यास किती मिळेल व्याज, पटापट चेक करा डिटेल्स

Union Bank मध्ये ४०० दिवसांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केल्यास किती मिळेल व्याज, पटापट चेक करा डिटेल्स

Union Bank Of India Investment Tips: युनियन बँक ऑफ इंडिया ही एक प्रमुख सरकारी बँक असून ती आपल्या ग्राहकांना एफडी योजनांवर उत्तम परतावा देत आहे. पाहा कोणती आहे स्कीम आणि किती मिळणार यात व्याज.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:04 IST2026-03-31T10:02:54+5:302026-03-31T10:04:18+5:30

Union Bank Of India Investment Tips: युनियन बँक ऑफ इंडिया ही एक प्रमुख सरकारी बँक असून ती आपल्या ग्राहकांना एफडी योजनांवर उत्तम परतावा देत आहे. पाहा कोणती आहे स्कीम आणि किती मिळणार यात व्याज.

How much interest will you get if you deposit rs 200000 in a 400 day FD in Union Bank quickly check the details | Union Bank मध्ये ४०० दिवसांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केल्यास किती मिळेल व्याज, पटापट चेक करा डिटेल्स

Union Bank मध्ये ४०० दिवसांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केल्यास किती मिळेल व्याज, पटापट चेक करा डिटेल्स

Union Bank Of India Investment Tips: युनियन बँक ऑफ इंडिया ही एक प्रमुख सरकारी बँक असून ती आपल्या ग्राहकांना एफडी योजनांवर उत्तम परतावा देत आहे. या बँकेत किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडता येतं. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या एफडी योजनांवर २.७५% ते ७.३५% पर्यंत व्याज मिळत आहे. आज आपण जाणून घेऊया की, ४०० दिवसांच्या एफडी योजनेत २ लाख रुपये जमा केल्यास किती व्याज मिळेल.

४०० दिवसांच्या एफडीवर किती व्याज मिळतं?

युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ४४४ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज देत आहे. बँकेनं नुकतीच ४४४ दिवसांच्या कालावधीची नवीन एफडी योजना लाँच केली आहे. या योजनेत सामान्य नागरिकांना ६.६०%, ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांवरील) ७.१०% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील) सर्वाधिक ७.३५% व्याज दिलं जात आहे.

१ एप्रिलपासून बदलणार कामाचे नियम; कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या सॅलरी ते ओव्हरटाईमवर होणार परिणाम

याव्यतिरिक्त, युनियन बँक ऑफ इंडिया ४०० दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ६.४०%, ज्येष्ठ नागरिकांना ६.९०% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.१५% व्याज देत आहे.

₹२ लाख जमा केल्यास किती मिळेल परतावा?

जर तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियाच्या ४०० दिवसांच्या एफडी योजनेत २ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे असेल:

  • सामान्य नागरिक: २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १४,४१२ रुपये निश्चित व्याजासह एकूण २,१४,४१२ रुपये मिळतील.
  • ज्येष्ठ नागरिक: २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १५,५७१ रुपये निश्चित व्याजासह एकूण २,१५,५७१ रुपये मिळतील.
  • अति ज्येष्ठ नागरिक: २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर १६,१५२ रुपये निश्चित व्याजासह एकूण २,१६,१५२ रुपये मिळतील.

Web Title : यूनियन बैंक एफडी: 400 दिनों की एफडी में ₹2 लाख पर ब्याज जानें

Web Summary : यूनियन बैंक आकर्षक एफडी दरें प्रदान करता है। 400 दिनों की एफडी सामान्य नागरिकों को 6.40%, वरिष्ठ नागरिकों को 6.90% और अति वरिष्ठ नागरिकों को 7.15% ब्याज देती है। ₹2 लाख का निवेश परिपक्वता पर क्रमशः ₹2,14,412, ₹2,15,571 और ₹2,16,152 का लाभ देता है।

Web Title : Union Bank FD: Know Interest on ₹2 Lakhs Investment in 400-Day FD

Web Summary : Union Bank offers attractive FD rates. A 400-day FD gives 6.40% to general citizens, 6.90% to senior citizens, and 7.15% to super senior citizens. Investing ₹2 lakhs yields ₹2,14,412, ₹2,15,571 and ₹2,16,152, respectively, upon maturity.