Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Price Today: नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर

Gold Silver Price Today: नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर

Gold Silver Price Today 31 Dec 2025: एमसीएक्स (MCX) नंतर आता सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:05 IST2025-12-31T13:04:27+5:302025-12-31T13:05:57+5:30

Gold Silver Price Today 31 Dec 2025: एमसीएक्स (MCX) नंतर आता सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Good news on the eve of the New Year 2026 Gold and silver prices have fallen significantly quickly check the prices of 18 22 24 carats | Gold Silver Price Today: नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर

Gold Silver Price Today: नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर

Gold Silver Price Today 31 Dec 2025: एमसीएक्स (MCX) नंतर आता सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. आज चांदीचा भाव २,८९६ रुपयांनी घसरुन २,२९,४३३ रुपये प्रति किलोवर आला आहे. विशेष म्हणजे, एमसीएक्समध्ये आज चांदी १५,००० रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे. दुसरीकडे, बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम १,५०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. जीएसटीसह चांदीचा दर आता २,३६,३१५ रुपये प्रति किलो झाला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,३७,०९१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय.

किमतीतील चढ-उतार आणि ऐतिहासिक उच्चांक

मंगळवारी चांदी जीएसटीशिवाय २,३२,१२९ रुपयांवर बंद झाली होती. त्याचप्रमाणे सोनं जीएसटीशिवाय १,३६,७८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आज विना जीएसटी सोन्याचा भाव १,३४,५९९ रुपयांवर बंद झाला. २९ डिसेंबर रोजी सोन्यानं १,३८,१८१ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत आता सोनं ५,०६२ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तसंच चांदी आपल्या २,४३,४८३ रुपयांच्या सर्वोच्च स्तरावरून १४,००५ रुपयांनी खाली आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे हे दर दिवसातून दोनदा जारी केले जातात.

या वर्षातील आणि डिसेंबरमधील वाढ

या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ५७,३५९ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी १,४३,४१४ रुपयांनी वधारली आहे. केवळ डिसेंबर महिन्यात आतापर्यंत चांदी ६७,९७० रुपयांनी आणि सोनं ८,००८ रुपयांनी महागलं आहे. सोमवारी आणि आज झालेल्या मोठ्या घसरणीनंतरही या वर्षातील एकूण दरवाढीचा आकडा मोठा आहे.

कॅरेटनुसार सोन्याचे ताजे दर (विना मेकिंग चार्ज)

आज सोन्याच्या विविध कॅरेटनुसार किमती खालीलप्रमाणे आहेत:

  • २३ कॅरेट गोल्ड: १,४९४ रुपयांच्या घसरणीसह १,३३,०९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत १,३७,०९१ रुपये झाली आहे.
  • २२ कॅरेट गोल्ड: १,३७४ रुपयांनी घसरून १,२१,९१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. जीएसटीसह हा दर १,२५,५७६ रुपये झाली.
  • १८ कॅरेट गोल्ड: १,३७४ रुपयांच्या घसरणीसह ९९,८२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले असून जीएसटीसह याची किंमत १,०२,८१८ रुपये झाली.
  • १४ कॅरेट गोल्ड: ८७७ रुपयांनी स्वस्त होऊन ७७,८६३ रुपयांवर उघडलं आणि जीएसटीसह ८०,१९८ रुपयांवर पोहोचले आहेत.

Web Title : नए साल की पूर्व संध्या पर सोना, चांदी की कीमतों में गिरावट: नवीनतम दरें जांचें

Web Summary : खरीदारों के लिए खुशखबरी! आज सोना और चांदी की कीमतों में काफी गिरावट आई। चांदी ₹2,896 गिरकर ₹2,29,433 प्रति किलो हो गई। सोना ₹1,500 प्रति 10 ग्राम कम हुआ, जिससे त्योहारों के मौसम में खरीदारी का अवसर मिला। दिसंबर में लाभ के बावजूद, कीमतें अब हाल के उच्च स्तर से कम हैं।

Web Title : Gold, Silver Prices Plunge on New Year's Eve: Check Latest Rates

Web Summary : Good news for buyers! Gold and silver prices significantly dropped today. Silver fell by ₹2,896 to ₹2,29,433 per kg. Gold decreased by ₹1,500 per 10 grams, offering a festive season buying opportunity. Despite December's gains, prices are now lower than recent highs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.