Gold vs Diamond : आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काहीजण काहीजण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा बँकेत गुंतवणूक करतात, तर काहीजण दागिन्यात पैसे गुंतवतात. दागिन्यांमध्ये गुंतवणूकीसाठी सोने-चांदी-हिरे, असे पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सोने आणि हिरे, यापैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल, याबाबत सांगणार आहोत. कोणत्या गुंतवणुकीत जास्त परतावा मिळेल, तज्ञ काय सांगतात..?
कृत्रिम हिऱ्यांचा बाजारावर परिणाम
अॅडलवाइज म्युच्युअल फंडाच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी सांगितात की, साधारणपणे एखाद्या गोष्टीची किंमत, ही मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या 20 वर्षांहून अधिक काळ लोटूनही परतावा देत नाहीत. हिऱ्याबद्दल बोलायचे झाले, तर गेल्या काही काळापासून प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांचा बाजारावर नकारात्मक परिणाम होतोय. प्रयोगशाळेत बनवल्या जाणाऱ्या हिऱ्यांमुळे नैसर्गिक हिऱ्यांच्या मूल्यावरच परिणाम झाला नाही, तर बाजारात हिऱ्यांची मागणीही कमी झाली आहे.
हिऱ्यांना ठराविक विक्री किंमत
कॅपिटल माइंडचे संस्थापक दीपक शेनॉय सांगतात की, हिऱ्याचे विक्री मूल्य मर्यादित आहे. पण, सोन्यात गुंतवणूक चांगला परतावा देते. न्यूयॉर्क टाईम्समध्ये काही अत्यंत महागड्या हिऱ्यांबद्दल एक लेख प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, काही लोकांनी हिरा विकत घेतला आणि पुन्हा विकण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगली किंमत मिळाली नाही. दुकानेही हिरा परत घ्यायला तयार नव्हती.
काही पुरवठादार डायमंड मार्केटवर नियंत्रण ठेवतात
गुंतवणूक सल्लागार अभिषेक कुमार म्हणतात, पूर्वीच्या काळातही लोक हिऱ्यापेक्षा सोन्याला चांगले मानत होते. सोने वितळले तरी ते सोनेच राहते. तर हिऱ्याच्या बाबतीत असे नाही. हिरे ग्लॅमरसाठी चांगले आहेत, परंतु गुंतवणुकीसाठी नाही. यासोबतच काही पुरवठादार डायमंड मार्केटवर नियंत्रण ठेवतात. आता बाजारात कृत्रिम हिऱ्यांची कमतरता नाही, त्यामुळे त्यांचा पुरवठा कधीच कमी होत नाही आणि कोणता खरा आणि कोणता कृत्रिम हिरा हे शोधणेही अवघड आहे. म्हणजेच, गुंतवणुकीच्या बाबतीत सोने हिऱ्यापेक्षा कितीतरी पटीने सरस आहे हे एकंदरीत स्पष्ट होते.
(टीप-हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)