Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी

Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी

Gold Silver Price 13 Jan.: सराफा बाजारात आजही चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली. या दोन्ही मौल्यवान धातूंनी आज पुन्हा एक नवी उच्चांकी पातळी गाठली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:37 IST2026-01-13T13:34:53+5:302026-01-13T13:37:47+5:30

Gold Silver Price 13 Jan.: सराफा बाजारात आजही चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली. या दोन्ही मौल्यवान धातूंनी आज पुन्हा एक नवी उच्चांकी पातळी गाठली आहे.

Gold Silver rates today 13 January 2025 break all records Silver increases by rs 32327 in 13 days gold rates rise by rs 7287 | Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी

Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी

Gold Silver Price 13 Jan.: सराफा बाजारात आजही चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली. या दोन्ही मौल्यवान धातूंनी आज पुन्हा एक नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. चांदीच्या किमतीत एका झटक्यात ५,९७१ रुपयांची वाढ झाली, तर सोनं केवळ २५ रुपयांनी महागलं. या दरवाढीसह, नवीन वर्षाच्या अवघ्या १३ दिवसांत चांदी ३२,३२७ रुपयांनी वधारली आहे, तर सोनं ७,२८७ रुपयांनी महाग झालंय.

आजचे ताजे दर

आज जीएसटीशिवाय चांदीचा भाव २,५७,२८३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जीएसटीसह चांदी आता २,७०,६२९ रुपये प्रति किलोवर गेली आहे. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,४४,६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीशिवाय आज सोन्याचा भाव १,४०,४८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. सोमवारी जीएसटीशिवाय चांदी २५६,७७६ रुपयांवर आणि सोनं १४०,४४९ रुपयांवर बंद झालं होतं. सध्या सोनं आणि चांदी दोन्ही विना जीएसटी 'ऑल टाइम हाय' स्तरावर आहेत. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आलेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते.

अमेरिकेची मोठी कारवाई! वर्षभरात एक लाखांहून अधिक व्हिसा रद्द; भारतीय विद्यार्थी, व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार?

कॅरेटनुसार सोन्याचे भाव

२३ कॅरेट गोल्ड: केवळ ३२ रुपयांच्या वाढीसह १३९,९१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १४४,११६ रुपये झाली आहे. यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

२२ कॅरेट गोल्ड: ३१ रुपयांनी महाग होऊन १२८,६८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं. जीएसटीसह हा दर १३२,५४२ रुपये झालाय.

१८ कॅरेट गोल्ड: २५ रुपयांची तेजी दिसून आली असून आज १०५,३६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत १०८,५२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.

१४ कॅरेट गोल्ड: या दरात १९ रुपयांची वाढ झाली असून आज ८२,१८२ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह याचे दर ८४,६४७ रुपयांवर आलेत.

Web Title : सोना-चांदी के दामों ने तोड़े रिकॉर्ड, 13 दिनों में भारी उछाल

Web Summary : सोना और चांदी की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंचीं। 13 दिनों में, चांदी ₹32,327 बढ़ी, सोना ₹7,287 बढ़ा। आज, चांदी जीएसटी के साथ ₹2,70,629/किलो और सोना (24 कैरेट) जीएसटी के साथ ₹1,44,690/10 ग्राम पर है।

Web Title : Gold and Silver Prices Soar, Breaking Records in 13 Days

Web Summary : Gold and silver prices hit record highs. In 13 days, silver jumped ₹32,327, gold rose ₹7,287. Today, silver is at ₹2,70,629/kg with GST, gold (24 Carat) at ₹1,44,690/10 grams with GST.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.