Lokmat Money >गुंतवणूक > काल ₹2000 अन् आज इतक्या रुपयांनी उतरले सोन्याचे भाव, चांदी ₹8000 नी घसरली...

काल ₹2000 अन् आज इतक्या रुपयांनी उतरले सोन्याचे भाव, चांदी ₹8000 नी घसरली...

Gold-Silver Rates: अमेरिकेच्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 20:13 IST2025-04-04T20:12:22+5:302025-04-04T20:13:12+5:30

Gold-Silver Rates: अमेरिकेच्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

Gold-Silver Rates: Gold prices fell by ₹ 2000 yesterday and by this much today, silver fell by ₹ 8000 | काल ₹2000 अन् आज इतक्या रुपयांनी उतरले सोन्याचे भाव, चांदी ₹8000 नी घसरली...

काल ₹2000 अन् आज इतक्या रुपयांनी उतरले सोन्याचे भाव, चांदी ₹8000 नी घसरली...


Gold-Silver Rates: अमेरिकेच्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेने भारतासह 180 देशांवर शुल्क लादले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडाने अमेरिकेवर 25% आणि चीनने 34% शुल्क लागू केले आहे. या अशा परिस्थितीत जागतिक मंदीचा धोका वाढला असून, डॉलर निर्देशांक घसरला आहे. डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे भारतातील सोन्या-चांदीच्या दरातही झपाट्याने घसरण झाली आहे.

आजचे सोन्याचे दर
दोन दिवसांत सोन्याच्या दरात 2000 रुपयांनी घट झाली आहे. तर, चांदीचे दर 7 हजार रुपयांहून अधिकने घसरले आहेत. MCX वर 5 जूनच्या फ्युचर्ससाठी सोन्याची किंमत आज 300 रुपयांनी स्वस्त झाली आहे, तर काल(गुरुवारी) सोन्याचा दर सुमारे 2000 रुपयांनी कमी झाला. सध्या, MCX वर 5 जूनच्या फ्युचर्ससाठी सोन्याचा दर 89750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आझचे चांदीचे दर
मल्टी कमोडिटी मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसांत चांदीच्या दरात 7000 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीची किंमत 3000 रुपयांनी कमी झाली. तर, 5 जूनच्या फ्युचर्ससाठी चांदीची किंमत 91362 रुपये प्रति किलो आहे. काल चांदीच्या भावात सुमारे 5500 रुपयांनी घट झाली होती. म्हणजेच, दोन दिवसांत वायदे बाजारात चांदीच्या दरात किलोमागे 8000 रुपयांनी घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 3092 डॉलर प्रति औंस असा आहे. ज्यामध्ये प्रति औंस 20 डॉलर्सची घसरण झाली आहे. 

सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 89948 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 916 (22 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 82724 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय, 750 (18 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याचा दर 67733 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच, 585 (14 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 52831 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Web Title: Gold-Silver Rates: Gold prices fell by ₹ 2000 yesterday and by this much today, silver fell by ₹ 8000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.