Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पाहा काय आहेत आजचे नवे दर?

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पाहा काय आहेत आजचे नवे दर?

MCX Gold Silver Price Today: कमोडिटी मार्केटमध्ये आज गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहेत आजचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:37 IST2026-02-26T11:37:04+5:302026-02-26T11:37:04+5:30

MCX Gold Silver Price Today: कमोडिटी मार्केटमध्ये आज गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहेत आजचे नवे दर.

Gold Silver Rate Today on mcx Big fall in gold and silver prices see what are today s new rates | Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पाहा काय आहेत आजचे नवे दर?

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पाहा काय आहेत आजचे नवे दर?

MCX Gold Silver Price Today: कमोडिटी मार्केटमध्ये आज गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर (MCX) चांदीच्या भावात सुमारे २ टक्क्यांची घट होऊन तो २,६२,८९२ रुपये प्रति किलोग्रामवर आला आहे. त्याचप्रमाणे, सोन्याच्या किमतीतही ०.४ टक्क्यांची घसरण दिसून आली असून तो १,६०,५१६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय. मागील सत्रात दोन्ही धातूंनी चांगली तेजी नोंदवली होती, ज्यानंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याचं दिसून येतंय.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींची स्थिती

जागतिक बाजारपेठेचा विचार केला असता, स्पॉट सिल्वरमध्ये ०.६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून तो ८८.८४ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. मागील सत्रात चांदीनं तीन आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. दुसरीकडे, स्पॉट गोल्डमध्ये किरकोळ वाढ दिसून आली असून तो ०.३ टक्क्यांनी वधारून ५,१८३.८५ डॉलर प्रति औंसवर पोहोचला. अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्ये मात्र ०.५ टक्क्यांची घसरण झाली असून तो ५,२००.५० डॉलर प्रति औंसवर आला.

भू-राजकीय तणावाचा बाजारपेठेवर परिणाम

गेल्या सहा सत्रांमध्ये सोन्याच्या किमतीत सुमारे ६ टक्क्यांची वाढ झाली होती, परंतु आज त्यात घट दिसून आली. मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तैनातीबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंमधील ही घसरण मर्यादित राहिली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात जिनिव्हा येथे आज होणाऱ्या चर्चेकडेही बाजाराचं लक्ष लागलं आहे. या चर्चेचा मुख्य उद्देश दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला अण्विक वाद सोडवणं हा आहे.

इतर मौल्यवान धातूंची वाटचाल

इतर मौल्यवान धातूंमध्ये प्लॅटिनमची किंमत ०.५ टक्क्यांनी घसरून २,२७४.१६ डॉलर प्रति औंसवर आली आहे, तर पॅलेडियममध्ये १.४ टक्क्यांची घसरण होऊन तो १,७७०.०५ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. मागील सत्रात या दोन्ही धातूंनी तीन आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.

गुंतवणूकदारांचे लक्ष आज जाहीर होणाऱ्या साप्ताहिक बेरोजगारी दाव्यांच्या आकडेवारीकडे लागले आहे, ज्यावरून फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या भूमिकेचा अंदाज बांधता येईल. मागील सत्रात एमसीएक्स गोल्ड एप्रिल फ्युचर्स ०.७४ टक्क्यांच्या वाढीसह १,६१,१४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता, तर चांदीच्या मार्च फ्युचर्समध्ये सुमारे ३ टक्क्यांची तेजी दिसून आली होती आणि तो २,६८,३१६ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाला होता.

Web Title : सोना, चांदी की कीमतों में आज गिरावट: नवीनतम दरें जांचें

Web Summary : हालिया लाभ के बाद मुनाफावसूली के कारण आज सोना और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। एमसीएक्स चांदी लगभग 2% गिरकर ₹2,62,892 प्रति किलोग्राम हो गई, जबकि सोना 0.4% गिरकर ₹1,60,516 प्रति 10 ग्राम हो गया। भू-राजनीतिक तनाव और आगामी अमेरिकी डेटा बाजार की धारणा को प्रभावित कर रहे हैं।

Web Title : Gold, Silver Prices Plummet Today: Check Latest Rates Now

Web Summary : Gold and silver prices fell sharply today due to profit-booking after recent gains. MCX silver dipped around 2% to ₹2,62,892 per kg, while gold fell 0.4% to ₹1,60,516 per 10 grams. Geopolitical tensions and upcoming US data are influencing market sentiment.