Gold Silver Price 17 October: धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात तेजीचं सत्र सुरूच आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव आज १ लाख रुपयांच्या पुढे गेलाय. एमसीएक्सनंतर आज सराफा बाजारातही सोनं नव्या सार्वकालिक उच्चांकावर (All Time High) पोहोचलंय. २४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह १,३४,८०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी जीएसटीसह १,७६,४१३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. आता ऑक्टोबर महिन्यात सोनं १५,५२५ रुपये प्रति १० ग्रॅमनं महाग झालंय, तर चांदीच्या किमतीत प्रति किलो २८८४१ रुपयांची वाढ झाली आहे.
आयबीजेएच्या (IBJA) माहितीनुसार, गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोनं जीएसटीशिवाय १,२७,४७१ रुपयांवर बंद झालं होतं. दुसरीकडे, चांदी देखील जीएसटीशिवाय १,६८,०८३ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज सोनं ३४०३ रुपयांची झेप घेऊन जीएसटीशिवाय १३०८७४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या दरानं उघडलं आणि चांदी ३१९२ रुपये प्रति किलोने महाग होऊन १७१२७५ रुपयांवर उघडली. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आणि दुसरे ५ वाजण्याच्या आसपास दर जारी केले जातात.
ना जन... ना धन... खाती धूळखात; २६ टक्के लोक करतच नाहीत वापर
शुक्रवारी सोन्याची किंमत १.२ टक्क्यांनी वाढून ४,३७९.९३ डॉलर प्रति औंस झाली, ज्यामुळे बाजार भांडवल (Market Capitalization) ३० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलं. यामुळे ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या जबरदस्त तेजीला आणखी पुढे नेत २००८ नंतरची आपली सर्वोच्च साप्ताहिक वाढ नोंदवण्याच्या मार्गावर आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
आज २३ कॅरेट सोनं देखील ३३८९ रुपयांनी महाग होऊन १२६९६१ रुपये प्रति १० ग्रॅमच्या भावानं उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १३४२६० रुपये झाली आहे. यात अद्याप मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ३११८ रुपयांनी वाढून ११९८८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली. जीएसटीसह ती १२३४७७ रुपये झालीये.
१८ कॅरेट सोनं २५५३ रुपयांच्या वाढीसह ९८१५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत १०११०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.
१४ कॅरेट सोनं देखील १९९० रुपयांनी महाग होऊन ७६५६१ रुपयांवर उघडलं आणि आता जीएसटीसह ७८८५७ रुपयांवर पोहोचलं आहे.