Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Price Today MCX: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; २ दिवसांत Silver मध्ये १० हजारांची घसरण, Gold चे दर काय? पाहा

Gold Silver Price Today MCX: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; २ दिवसांत Silver मध्ये १० हजारांची घसरण, Gold चे दर काय? पाहा

Gold Silver Price Today MCX: आज १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:44 IST2026-03-12T10:42:32+5:302026-03-12T10:44:55+5:30

Gold Silver Price Today MCX: आज १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver rate Today mcx 12 march 2026 Gold and silver prices fall Silver falls by 10 thousand in 2 days what is the price of Gold | Gold Silver Price Today MCX: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; २ दिवसांत Silver मध्ये १० हजारांची घसरण, Gold चे दर काय? पाहा

Gold Silver Price Today MCX: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; २ दिवसांत Silver मध्ये १० हजारांची घसरण, Gold चे दर काय? पाहा

Gold Silver Price Today MCX:  आज १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव १,६१,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,६६,९६९ रुपये प्रति किलो वर आला. विशेष म्हणजे केवळ दोन दिवसांत चांदीच्या किमतीत १०,००० रुपयांहून अधिक, तर सोन्याच्या किमतीत सुमारे १,५०० रुपयांची घसरण झाली आहे. सहसा भू-राजकीय तणाव वाढल्यावर किमती वाढतात, मात्र यावेळी मॅक्रो इकॉनॉमिक घटकांमुळे किमतींवर दबाव दिसून येत आहे.

किमती घसरण्याची प्रमुख कारणं

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीचे दर खाली येण्यामागे खालील कारणे आहेत:

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ : कच्च्या तेलाचे दर नवीन उच्चांकावर पोहोचल्यामुळे कमोडिटी मार्केटवर त्याचा परिणाम होत आहे. मध्य-पूर्वेतील तणावामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

डॉलरकडे आकर्षण : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धामुळे गुंतवणूकदार डॉलरसारख्या मालमत्तांकडे अधिक आकर्षित होत आहेत.

नफा वसुली : किमती आधीच उच्च स्तरावर होत्या, त्यात थोडी वाढ होताच गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी विक्री सुरू केली, ज्यामुळे दरात करेक्शन आली.

पर्यायी गुंतवणूक : सोने-चांदी व्यतिरिक्त गुंतवणूकदार आता डॉलर, क्रूड ऑइल आणि डिफेन्स स्टॉक्स यांसारख्या इतर 'सेफ हेवन' पर्यायांकडे वळत आहेत.

शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरूच; सेन्सेक्स ९०० अंकांनी आपटला; निफ्टी २३,६०० च्या लेव्हलच्या खाली

MCX वरील या आठवड्यातील दरांचा आढावा

बुधवार: सोनं १,६१,९७६ रुपये (१० ग्रॅम) आणि चांदी २,६९,२११ रुपये (किलो) वर बंद झालं.
मंगळवार: सोन्याचा दर १,६३,२०१ रुपये आणि चांदीचा दर २,७७,००० रुपयांवर बंद झाला होता.
सोमवार: सोन्याची किंमत १,६०,३८७ रुपये आणि चांदी २,६७,६०० रुपयांवर बंद झाली होती.

आजचे दिल्लीतील किरकोळ बाजार भाव

  • २४ कॅरेट सोनं: १,६३,४७० रुपये प्रति १० ग्रॅम.
  • २२ कॅरेट सोनं: १,४९,८६० रुपये प्रति १० ग्रॅम.
  • चांदी (१ किलो): २,८९,९०० रुपये.

Web Title : MCX पर सोना, चांदी के दामों में गिरावट; चांदी में भारी गिरावट

Web Summary : MCX पर सोना और चांदी की कीमतों में गिरावट आई, चांदी दो दिनों में ₹10,000 तक गिरी। व्यापक आर्थिक कारक, कच्चे तेल की बढ़ती कीमतें और एक मजबूत डॉलर कीमतों पर दबाव डाल रहे हैं। भू-राजनीतिक तनाव के बीच निवेशक सुरक्षित ठिकानों की ओर रुख कर रहे हैं। दिल्ली में खुदरा सोने की कीमत ₹63,470 (24 कैरेट) है।

Web Title : Gold, Silver Prices Decline on MCX; Silver Drops Sharply

Web Summary : Gold and silver prices fell on MCX, with silver plummeting ₹10,000 in two days. Macroeconomic factors, rising crude oil prices, and a stronger dollar are pressuring prices. Investors are shifting to safer havens amid geopolitical tensions. Delhi's retail gold price is ₹63,470 (24 Carat).