Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > चांदीच्या किमतीत ६ हजारांपेक्षा तर सोन्याच्या किमतीत ३ हजारांपेक्षा अधिक वाढ, खरेदीपूर्वी पहा नवे दर

चांदीच्या किमतीत ६ हजारांपेक्षा तर सोन्याच्या किमतीत ३ हजारांपेक्षा अधिक वाढ, खरेदीपूर्वी पहा नवे दर

Gold Silver Price Today 30 March: सोमवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, आज सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:08 IST2026-03-30T14:08:27+5:302026-03-30T14:08:27+5:30

Gold Silver Price Today 30 March: सोमवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, आज सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

Gold Silver Rate Today ibja bullions co 30 March Silver price increased by more than 6 thousand and gold price by more than 3 thousand check new rates before buying | चांदीच्या किमतीत ६ हजारांपेक्षा तर सोन्याच्या किमतीत ३ हजारांपेक्षा अधिक वाढ, खरेदीपूर्वी पहा नवे दर

चांदीच्या किमतीत ६ हजारांपेक्षा तर सोन्याच्या किमतीत ३ हजारांपेक्षा अधिक वाढ, खरेदीपूर्वी पहा नवे दर

Gold Silver Price Today 30 March: सोमवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४६,२१७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. गेल्या शुक्रवारी हा भाव १,४२,९४२ रुपये होता, म्हणजेच आज सोने ३,२७५ रुपयांनी महागलं. २२ कॅरेट सोन्याचा विचार केल्यास, आज हा भाव १,४५,६३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून यात ३,२६१ रुपयांची वाढ झाली; शुक्रवारी याची किंमत १,४२,३७० रुपये होती.

१८ कॅरेट सोन्याचा भाव आज सोमवारी १,३३,९३५ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. याचा मागील बंद भाव १,३०,९३५ रुपये होता, म्हणजेच यात ३,००० रुपयांची वाढ झाली. दरम्यान, bullions.co.in नुसार २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६९० रुपयांची वाढ होऊन ते १,४८,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर विकलं जात आहे.

देशातील सर्वात मोठ्या IPO ची बिकट अवस्था; ७ दिवसांत ६ वेळा कोसळला शेअर, गुंतवणूकदार हतबल!

आजचे चांदीचे दर

IBJA नुसार, आज एक किलो चांदीची किंमत २,२७,९९२ रुपये आहे. गेल्या शुक्रवारी चांदी २,२१,६४७ रुपये प्रति किलो दरानं विकली जात होती, म्हणजेच आज चांदीच्या दरात ६,३४५ रुपये प्रति किलोची मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, bullions.co.in वर चांदी २,२९,६२० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून त्यात १,२४० रुपयांची वाढ दिसून येत आहे. IBJA दिवसातून दोनदा सोन्या-चांदीचे दर जाहीर करते.

MCX वरील सोन्या-चांदीचे दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर जून एक्सपायरीच्या सोन्याचे दर ०.२७% घसरणीसह ₹१,४६,८५० प्रति १० ग्रॅमवर उघडले, तर मागील बंद भाव ₹१,४७,२५५ होता. व्यवहारादरम्यान सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊन ते ₹३,०४३ म्हणजेच २.०६% नी कोसळून ₹१,४४,२१२ च्या 'इंट्राडे लो' पर्यंत पोहोचले. मात्र, नंतर यात जोरदार रिकव्हरी आली आणि सोने ₹१,४९,२५० च्या 'इंट्राडे हाय' वर पोहोचले, जे सुमारे १.३५% किंवा ₹१,९९५ ची वाढ दर्शवते.

MCX चांदीचे दर ०.०६% च्या किरकोळ वाढीसह ₹२,२८,१०६ प्रति किलो वर उघडले, तर मागील बंद भाव ₹२,२७,९५४ होता. सुरुवातीला चांदीत हलकी घसरण पाहायला मिळाली, परंतु लवकरच भाव सावरले आणि दिवसभर चांदी मजबूतीसह व्यवहार करताना दिसली.

Web Title : सोने और चांदी की कीमतों में उछाल; खरीदने से पहले दरें जांचें!

Web Summary : सोने की कीमतों में ₹3,000 से अधिक, चांदी में ₹6,000 से अधिक की वृद्धि हुई। निवेश से पहले नवीनतम दरें जांचें। एमसीएक्स में अस्थिरता देखी गई।

Web Title : Gold and silver prices surge; check rates before buying now!

Web Summary : Gold prices soared over ₹3,000, silver jumped over ₹6,000. Check latest rates before investing. MCX saw volatility.