Gold Silver Rate Today: आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात जिथे किरकोळ घसरण झाली आहे, तिथे चांदीनं 'ऑल टाइम हाय' म्हणजेच सर्वोच्च स्तर गाठला आहे. चांदीचा भाव जीएसटीशिवाय २,८९४ रुपयांनी वधारून २,४६,०४४ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जीएसटीसह चांदी आता २,५३,४२५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर आता जीएसटीसह १,४०,७१३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जीएसटीशिवाय आज सोन्याचे भाव ४५ रुपयांच्या किरकोळ घसरणीसह १,३६,६१५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं.
मंगळवारी चांदी जीएसटीशिवाय २,३३,१५० रुपयांवर बंद झाली होती. त्याचप्रमाणे सोनं जीएसटीशिवाय १,३६,६६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. जीएसटीशिवाय सोनं २९ डिसेंबर २०२५ च्या १,३८,१८१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावरून १,५४६ रुपयांनी स्वस्त झालं आहे. मात्र, आज ७ जानेवारी रोजी जीएसटीशिवाय चांदीनं २,४६,०४४ रुपयांची नवीन उंची गाठली आहे.
दर महिन्याला ₹५,००० जमा केले तर २० वर्षांमध्ये किती फंड तयार होईल; पटापट पाहा कॅलक्युलेशन
हे दर आयबीजेएद्वारे (IBJA) जारी करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते; एकदा दुपारी १२ वाजेच्या सुमारास आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास दर जाहीर केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
२३ कॅरेट सोनं: आज ४४ रुपयांनी घसरून १,३६,०६८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत आता १,४०,१५० रुपये झाली आहे. (यात मेकिंग चार्जचा समावेश नाही).
२२ कॅरेट सोनं: याची किंमत ४२ रुपयांनी स्वस्त होऊन १,२५,१३९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह हा दर १,२८,८९३ रुपये आहे.
१८ कॅरेट सोनं: यात ३४ रुपयांची घसरण झाली आहे. आज हे १,०२,४६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं असून जीएसटीसह याची किंमत १,०५,५३४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.
१४ कॅरेट सोनं: याचा दरही २६ रुपयांनी घसरला आहे. आज हे ७९,९२० रुपयांवर उघडले आणि जीएसटीसह ८२,३१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे.
