Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Gold Silver Price 16 June: सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. जीएसटी जोडून दोन्हींच्या किमती एक लाखाच्या पुढे गेल्यात. पाहा काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:47 IST2025-06-16T14:46:24+5:302025-06-16T14:47:07+5:30

Gold Silver Price 16 June: सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. जीएसटी जोडून दोन्हींच्या किमती एक लाखाच्या पुढे गेल्यात. पाहा काय आहेत नवे दर?

Gold Silver prices 16 june 2025 all time high Know latest rates before buying tata motors stock market iran israel conflict affect | Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Gold Silver Price 16 June: सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. जीएसटी जोडून दोन्हींच्या किमती एक लाखाच्या पुढे गेल्यात. कोलकात्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव १०२१९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १०९६८४ रुपये प्रति किलो आहे. जीएसटीशिवायच्या किंमतींबद्दल बोलायचं झालं तर सोनं शुक्रवारच्या बंद किमतीपेक्षा १५६ रुपयांनी वधारून ९९,२१४ रुपयांवर उघडलं. हा आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. तर चांदीही ३२३ रुपयांनी वधारून १०६४९० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. जीएसटीशिवाय चांदीचा उच्चांकी स्तर १०७००० रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीचे स्पॉट रेट जाहीर केले आहेत. यावर GST लागू नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

हेही वाचा - एकही डिग्री नाही, बनले जगातील दुसरे श्रीमंत
 

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर?

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील १५६ रुपयांनी महागले आणि ते ९८८१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत दुपारी १४३ रुपयांनी वाढली आणि ती ९०९८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमत देखील ११७ रुपयांनी महागली आणि ती ७४४११ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ९१ रुपयांनी वाढून ५८०४० रुपये झाली आहे. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत.

का वाढतेय किंमत?

केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते, इराण-इस्रायलमधील तणाव, रशिया-युक्रेनमधील तणाव आणि जगभरातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीकडे वळत आहेत. सोन्यासोबतच चांदीलाही याचा फायदा होत आहे. त्याच वेळी, कमी पुरवठा आणि वाढत्या औद्योगिक मागणीमुळे, चांदीमध्ये बरीच गुंतवणूक केली जात आहे. अलिकडच्या काही महिन्यांत, चांदीचा पुरवठा कमी असल्यानं आणि सोन्यापेक्षा चांदीच्या ईटीएफवर जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा असल्यानं गुंतवणूकदारांचा चांदीमध्ये रस सतत वाढत आहे.

Web Title: Gold Silver prices 16 june 2025 all time high Know latest rates before buying tata motors stock market iran israel conflict affect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.