Lokmat Money >गुंतवणूक > सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठा बदल, खरेदीपूर्वी पाहा १० ग्राम सोन्याचा नवा दर

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठा बदल, खरेदीपूर्वी पाहा १० ग्राम सोन्याचा नवा दर

Gold Silver Price Today 4 March: लग्नसराईच्या काळात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:56 IST2025-03-04T14:55:37+5:302025-03-04T14:56:20+5:30

Gold Silver Price Today 4 March: लग्नसराईच्या काळात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालीये.

Gold Silver Price Today 4 March know 10 gram gold price before buying latest rate price hike before marriage season holi | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठा बदल, खरेदीपूर्वी पाहा १० ग्राम सोन्याचा नवा दर

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठा बदल, खरेदीपूर्वी पाहा १० ग्राम सोन्याचा नवा दर

लग्नसराईच्या काळात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव ४९७ रुपयांनी वधारून ८५,९१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीही ५७५ रुपयांनी वधारून ९४,९७३ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) हे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. आज सोन्याचा भाव ४९५ रुपयांनी वधारून ८५,४७३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ४५५ रुपयांनी वाढून ७८,६०८ रुपये झाला. तर १८ कॅरेटचा भाव ३७३ रुपयांनी वाढून ६४,३६३ रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता २९१ रुपयांनी वाढून ५०,२०३ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.

२०२५ मध्ये आतापर्यंत सोनं १०,०७७ रुपयांनी तर चांदी ८९५६ रुपयांनी महागली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.

सोन्याचे दर कसे ठरवले जातात?

सोने आणि चांदीच्या दरांवर जागतिक आणि स्थानिक घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्परसंबंधाचा परिणाम होतो. जागतिक मागणी, चलन विनिमय दर, व्याजदर, सरकारी धोरणं आणि जागतिक घडामोडी यासारखे घटक त्यांच्या मूल्यावर लक्षणीय परिणाम करू शकतात.

Web Title: Gold Silver Price Today 4 March know 10 gram gold price before buying latest rate price hike before marriage season holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.