Gold Silver Price Today 31 January: १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या २०२५ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी आज सोनं खरेदी करणाऱ्यांचं मात्र बजेट गडबडणार आहे. सोन्याच्या किंमतींनी आजही विक्रमी तेजी दिसून आली. सोन्यानं नवा उच्चांक गाठलाय. सराफा बाजारात सोन्याचा सरासरी भाव मागील बंदच्या तुलनेत ८६२ रुपयांनी वाढून ८२१६६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदी ९९३ रुपयांनी वधारून ९३,१७७ रुपयांवर पोहोचली. २३ कॅरेट सोन्याचा भाव ८१,८३६ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव ७५,२६३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ६१,६२४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाहीय कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. जानेवारी २०२५ मध्ये सोनं ६४२५ रुपयांनी महागलं आहे, तर चांदीच्या किंमतीत ७१६० रुपयांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलोवर उघडला होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.
का वाढतेय किंमत?
सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात वाढ होण्याची भीती सराफा बाजारात आहे. सध्या यावर ६ टक्के ड्युटी आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ होऊ शकते. यामुळेच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे, जागतिक बाजारातील तेजीमुळे शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीनं नवा उच्चांक गाठला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरील अनिश्चिततेमुळे जागतिक स्तरावर सोन्याचे दर गगनाला भिडलेत.