Gold Silver Price Today 3 March: फेब्रुवारीमध्ये विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोन्याला मार्चमध्ये थंड सुरुवात झाली. सध्या लग्नसराईचा हंगाम आता सुरू होत आहे. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. आज, ३ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली. सराफा बाजारात सोन्याचा भाव ३६ रुपयांनी घसरून ८५,०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
तर चांदीचा भाव १७३ रुपयांनी घसरून ९३,४८० रुपये प्रति किलो झाला. तर एमसीएक्सवर ४ एप्रिल रोजी सोन्याचा वायदा भाव ०.५५ टक्क्यांनी वधारून ८४,६८२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. तर दुपारी दीडच्या सुमारास चांदीचा भाव ०.४२ टक्क्यांनी वधारून ९४,७२६ रुपये प्रति किलो झाला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) हे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. तुमच्या शहरात याच्या किंमतीत बदल असू शकतो.
आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर करण्यात येतात.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचे नवे दर
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ३६ रुपयांनी कमी होऊन ८४,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भावही ३३ रुपयांनी कमी होऊन ७७,८७८ रुपये झाला आहे. तर १८ कॅरेटचा भाव २७ रुपयांनी घसरून ६३,७६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता ४९,७३७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.