Lokmat Money >गुंतवणूक > सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

Gold Silver Rate : जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:41 IST2025-05-29T13:40:31+5:302025-05-29T13:41:28+5:30

Gold Silver Rate : जागतिक घडामोडींमुळे सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.

gold silver price today 29 may 2025 gold becomes cheaper | सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

Gold Silver Rate : भारतात सोन्याला नेहमीच महत्त्वाचे स्थान आहे. सणासुदीला असो किंवा गुंतवणुकीसाठी, सोन्याकडे एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिलं जातं. पण, आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक थोडी कमी झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शुल्क रद्द केल्यामुळे आणि जागतिक बाजारात अनिश्चितता कमी झाल्यामुळे, सोन्याचे दर घसरले आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळेही सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे.

आज सोन्याच्या दरात मोठी घसरण!

  • २४ कॅरेट सोन्याचा दर: आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ८३० रुपयांनी स्वस्त होत ९४,८३० रुपये झाली आहे.
  • २२ कॅरेट सोन्याचा दर: तर १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किमतीज आज ७९ रुपयांनी घट झाल्याने ८६८६४ रुपये झाली.
  • १८ कॅरेट सोन्याचा दर: १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याची किंमत ७१,१२३ रुपये आहे. यामध्ये ६५२ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (२२ कॅरेट, प्रति १० ग्रॅम)
सोन्याची किंमत दररोज डॉलरच्या किमतीतील चढ-उतार, कच्च्या तेलाच्या किमती आणि विनिमय दर यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते.

घसरणीमागे काय कारण?

सोन्याच्या किमती घसरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले शुल्क रद्द केलं आहे. या निर्णयामुळे सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यावर दबाव वाढला आहे. याशिवाय, अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळेही सोन्याचे दर कमी झाले आहेत.

वाचा - शेअर बाजाराचा धोका नकोय? SIP मधून करोडपती बनण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

सोन्याच्या शुद्धतेची खात्री कशी कराल?
सोनं खरेदी करताना, नेहमी भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे प्रमाणित हॉलमार्क केलेले सोनं खरेदी करा. सोन्यावर ६ अंकी हॉलमार्क कोड असतो, ज्याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असेही म्हणतात. हा क्रमांक अल्फा-न्यूमेरिक (उदा. AZ4524) असतो, ज्यामुळे तुम्ही सोन्याच्या शुद्धतेची आणि विश्वासार्हतेची खात्री करू शकता.

Web Title: gold silver price today 29 may 2025 gold becomes cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.