Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं, २,१७,००० रुपयांवर चांदी

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं, २,१७,००० रुपयांवर चांदी

Gold Silver Rate Today Crash On MCX: सोन्या-चांदीच्या किमतींसाठी या आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे. सोमवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:59 IST2026-03-24T10:57:08+5:302026-03-24T10:59:39+5:30

Gold Silver Rate Today Crash On MCX: सोन्या-चांदीच्या किमतींसाठी या आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे. सोमवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले.

Gold Silver Price today 24 march on mcx Crash Big fall in gold and silver prices Gold falls by Rs 42968 from all time high silver at Rs 217000 | Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं, २,१७,००० रुपयांवर चांदी

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं, २,१७,००० रुपयांवर चांदी

Gold Silver Rate Today Crash On MCX: सोन्या-चांदीच्या किमतींसाठी या आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे. सोमवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले, त्यानंतर २४ मार्च, मंगळवारी देखील मोठी घसरण नोंदवली जात आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर आज सोन्याचा भाव १,३७,०३२ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,१७,०२६ रुपये प्रति किलोवर आला आहे.

२४ मार्च रोजी किमतीत मोठी घट

देशांतर्गत वायदा बाजारात आज बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या किमतीत २,२४८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीच्या किमतीत ८,३९७ रुपये प्रति किलोची मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोमवारी एमसीएक्सवर सोन्याची किंमत १,३९,२८० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,२५,४२३ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

शेअर बाजारात तेजी, पण इराणनं ट्रम्प यांचा चर्चेचा दावा फेटाळला; बाजारावर काय परिणाम होणार?

ऐतिहासिक उच्चांकावरुन दर किती कमी झाले?

२९ जानेवारी २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांकी स्तर (All-time High) गाठला होता. तेव्हा सोन्याचा भाव १,८०,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. म्हणजेच, आपल्या ऐतिहासिक विक्रमापासून सोनं ४२,९६८ रुपयांनी खाली आलंय.

तसंच, २९ जानेवारी २०२६ रोजी चांदीची किंमत ४,२०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. तिथून आता चांदी २,०२,९७४ रुपये प्रति किलोनं खाली घसरली.

मध्य पूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव

सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांवरील हल्ले ५ दिवसांसाठी पुढे ढकलण्याची घोषणा केली. यामुळे मध्य पूर्वेतील वाढता तणाव कमी होत असल्याचं वाटत होतं. मात्र, मंगळवारी इराणनं उत्तर दिले की त्यांनी अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. यामुळे पुन्हा भू-राजकीय तणाव वाढताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती, परंतु आज पुन्हा तेजी परतली आहे. त्यामुळेच सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर दबाव वाढताना दिसत आहे.

Web Title : सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट; रिकॉर्ड ऊंचाई से गिरावट।

Web Summary : एमसीएक्स पर सोना और चांदी की कीमतों में गिरावट आई। सोना अपने शिखर से ₹42,968 नीचे गिरा। भू-राजनीतिक तनाव और अस्थिर तेल की कीमतें बाजार की अस्थिरता में योगदान करती हैं।

Web Title : Gold and silver prices crash; decline from all-time high.

Web Summary : Gold and silver prices plummeted on MCX. Gold fell ₹42,968 from its peak. Geopolitical tensions and fluctuating oil prices contribute to market volatility.