Gold Silver Rate Today 16 Feb 2026: एमसीएक्सवरील घसरणीच्या विरुद्ध आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव आज १,३१५ रुपयांनी महागून १,५४,०८० रुपये प्रति १० ग्रॅम या दरावर उघडला. सोन्याचा हा दर सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा आता २२,०४१ रुपयांनी स्वस्त आहे. जीएसटीसह सोन्याची किंमत आज १,५८,७०२ रुपयांवर पोहोचली. दुसरीकडे, प्लॅटिनमच्या दरात ४३४ रुपयांची घसरण झाली असून तो ६३,६६९ रुपयांवर आला.
काय आहेत नवे दर?
शुक्रवारी २४ कॅरेट सोनं जीएसटीशिवाय १,५२,७६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आयबीजेएद्वारे दिवसातून दोनदा सोन्याचे दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केल्यास, स्पॉट गोल्ड १.१ टक्क्यांनी घसरून ४,९८६.३२ डॉलर प्रति औंसवर आलं आहे, तर अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्ये (एप्रिल डिलिव्हरी) ०.८ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून ते ५,००५.६० डॉलर प्रति औंसवर बंद झाले.
भारतीय AI मॉडल Sarvam Edge नं 'गेम'च बदलला; फोन, लॅपटॉपवर विना इंटरनेट काम करणार
१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर
कॅरेटनुसार सोन्याच्या दराचा विचार केल्यास, आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १,२०५ रुपयांच्या वाढीसह १,४१,१३७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर १,४५,३७१ रुपये इतका झालाय. तसंच १८ कॅरेट सोन्यामध्ये ९८६ रुपयांची तेजी नोंदवण्यात आली असून आज ते १,१५,५६० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह १८ कॅरेट सोन्याची किंमत १,१९,०२६ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे ताजे दर
१४ कॅरेट सोन्याचा दर ७६९ रुपयांच्या वाढीसह ९०,१३७ रुपयांवर उघडला असून जीएसटीसह हे सोनं ९२,८४१ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं मिळेल. तसंच २३ कॅरेट सोन्याच्या दरातही आज १,३१० रुपयांची वाढ झाली असून ते १,५३,४६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत आता १,५८,०६६ रुपये झाली.
