Gold Silver Price Today 14 January: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी २४ कॅरेट सोनं सरासरी २८३ रुपये प्रति १० ग्रॅमनं स्वस्त झालं आणि ७८०२५ रुपये दरानं उघडलं. तर, चांदी १४०० रुपये प्रति किलोनं स्वस्त झाली आणि सरासरी ८८४०० रुपये प्रति किलो दरानं उघडली. सोनं अजूनही त्याच्या उच्चांकी पातळीपेक्षा १६५६ रुपयांनी तर चांदी ९९४० रुपयांनी स्वस्त आहे. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सोनं ७९६८१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९८३४० रुपये प्रति किलो होती.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. यात तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल.
काय आहेत नवे दर?
आयबीजेएनं जाहीर केलेल्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव २८१ रुपयांनी कमी होऊन ७७७१३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव २५७ रुपयांनी घसरला असून तो ७१४७१ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला आहे. तर दुसरीकडे १८ कॅरेट सोन्याची किंमत २१२ रुपयांनी कमी होऊन ५८,५१९ रुपये प्रति १० ग्राम झाली. तर १४ कॅरेट सोन्याची किंमत १६५ रुपयांनी घसरुन ४५६४५ रुपयांवर आली.