Gold Silver Price Today 14 Feb: आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला सोन्या-चांदीचे दागिने गिफ्ट करायचे असतील तर आज तुम्हाला तुमचा खिसा थोडा अधिक हलका करावा लागू शकतो. कारण, आज २४ कॅरेट सोन्याच्या भावानं नवा उच्चांक गाठलाय. १४ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ३४१ रुपयांनी वाढून ८६,०८९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. तर, चांदी १९४५ रुपयांनी वधारून ९७,४९४ रुपये प्रति किलोवर पोहोचली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.
सोन्यापेक्षा चांदीत मोठी तेजी
यंदा सोन्या-चांदीच्या शर्यतीत चांदीनं बाजी मारली आहे. आतापर्यंत सोनं १०,३४९ रुपयांनी तर चांदी ११,४७७ रुपयांनी महागलीये. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा भाव ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ३३९ रुपयांनी वाढून ८५,७४४ रुपये झालाय. २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव आता ३१३ रुपयांनी वाढून ७८,८५८ रुपये झालाय. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव २५६ रुपयांनी वाढून ६४,५६७ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता १९९ रुपयांनी वाढून ५०,३६२ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.
फेब्रुवारीतील विक्रमी कामगिरी
- ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्यानं ८३,०१० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला होता.
- ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सोन्यानं ८४,६५७ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला.
- ६ फेब्रुवारी रोजी सोन्यानं ८४,६७२ रुपयांचा उच्चांक गाठला.
- ७ फेब्रुवारी रोजी सोन्यानं ८४,६९९ रुपयांचा उच्चांक गाठला होता.
- १० फेब्रुवारीला सोन्यानं ८५,६६५ रुपयांचा नवा उच्चांक गाठला.
- ११ फेब्रुवारी रोजी सोन्यानं आणखी एक इतिहास रचला आणि ८५,९०३ रुपये प्रति १० ग्रॅमचा नवा उच्चांक गाठला.