Gold-Silver Price : देशांतर्गत तसेच जागतिक बाजारात शुक्रवारी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सोनं सुमारे ₹2,000 प्रति 10 ग्रॅमने, तर चांदी ₹4,000 प्रति किलोनं स्वस्त झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,21,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे, जो कालच्या तुलनेत सुमारे ₹2,000 ने कमी आहे.
विविध कॅरेट सोन्याचे दर घटले
23 कॅरेट सोनं: ₹1,22,860 प्रति 10 ग्रॅम (₹1,800 नं घट)
22 कॅरेट सोनं: ₹1,11,310 प्रति 10 ग्रॅम (₹1,700 नं घट)
18 कॅरेट सोनं: ₹91,139 प्रति 10 ग्रॅम
14 कॅरेट सोनं: ₹71,088 प्रति 10 ग्रॅम
सकाळच्या तुलनेत ही घसरण सरासरी ₹1,000-₹2,000 दरम्यान राहिली.
चांदीत मोठी घसरण
कालच्या तुलनेत चांदीचा दर तब्बल ₹4,400 नं घसरुन ₹1,51,450 वरुन ₹1,47,033 प्रति किलोवर आला आहे. ही घट केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आशियाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही दिसली आहे.
MCX (Multi Commodity Exchange) वरही घसरण
सोनं (डिसेंबर वायदा): ₹2,171 नं कमी होऊन ₹1,21,933 प्रति 10 ग्रॅम
चांदी (डिसेंबर वायदा): ₹2,834 ने कमी होऊन ₹1,45,678 प्रति किलो
MCX च्या आकडेवारीनुसार, एप्रिलमधील उच्चांकाच्या तुलनेत
सोनं ₹10,000 नं, तर चांदी ₹25,000 नं स्वस्त झाली आहे.
घसरणीची कारणं काय?
अनेक महिन्यांच्या विक्रमी वाढीनंतर नफा वसुली सुरू झाल्यामुळे किमती घसरत आहेत.
अमेरिका-चीन व्यापारातील तणाव कमी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूकीसाठी मागणी कमी झाली आहे.
मजबूत डॉलर आणि स्थिर अमेरिकन उत्पन्नामुळे सोन्याच्या किमतीही कमी झाल्या आहेत.
धनत्रयोदशी व दिवाळीनंतर दागिन्यांच्या खरेदीत घट झाल्याने स्थानिक मागणी कमी झाली आहे.
