Gold Silver Price Today: आज सोनं आणि चांदीच्या दरात जबरदस्त तेजी दिसून येत आहे. सोन्याची किंमत पुन्हा एकदा ऑल टाइम हाय (All Time High) पातळीवर पोहोचली आहे, तर चांदीच्या किमतीत २००० रुपयांहून अधिकची मोठी वाढ झाली आहे.
एमसीएक्सवर ३ ऑक्टोबरच्या डिलिव्हरीचं सोनं १,१०० रुपयांनी (म्हणजे सुमारे १ टक्क्यानं) वाढून प्रति १० ग्रॅम १,१४,९३१ रुपयांवर पोहोचलं आहे. सोनं ४६ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरीकडे वाटचाल करत आहे. या वर्षी सोन्यानं ३८ वेळा ऑल टाइम हायचा विक्रम नोंदवला आहे. या दरम्यान त्याची किंमत सुमारे ४३ टक्के वाढली आहे आणि हे १९७९ नंतरचे सर्वात चांगल्या कामगिरीच्या दिशेनं जात आहे.
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
सोन्याच्या दरातील व्यवहार
सोने एमसीएक्सवर मागील सत्रात १,१३,७८८ रुपयांवर बंद झाले होते आणि आज १,१४,३०० रुपयांवर उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात ते १,१४,३००.०० रुपयांपर्यंत खाली आणि १,१४,९३१.०० रुपयांपर्यंत वर गेलं. सकाळच्या सुमारास, सोनं १,११२ रुपयांनी (म्हणजे ०.९८ टक्क्यांनी) वाढून १,१४,९०० रुपयांवर ट्रेड करत होतं. जागतिक बाजारातही सोनं ३,७९८.३२ डॉलर्सच्या ऑल टाइम हायवर ट्रेड करत आहे. डॉलरचा कमकुवतपणा आणि फेड रिझर्व्हनं व्याजदरात कपात करण्याचा प्रकार सुरू ठेवण्याच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या किमतीत ही वाढ झाली आहे.
चांदीची किंमत
दरम्यान, चांदीच्या किमतीतही मोठी तेजी दिसून आली आहे. एमसीएक्सवर ५ डिसेंबरच्या डिलिव्हरीची चांदी १,५१९ रुपयांनी (म्हणजे १.०७ टक्क्यांनी) वाढून प्रति किलो १,४३,४०८ रुपयांवर ट्रेड करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात ती १,४१,७५८ रुपयांपर्यंत खाली आणि १,४४,१७९ रुपयांपर्यंत वर गेली. मागील सत्रात ती १,४१,८८९ रुपयांवर बंद झाली होती, तर आज १,४१,७५८ रुपयांवर उघडली.