Gold Silver Rate Today: सराफा बाजारात आज चांदीनं नवा इतिहास रचला असून ती २,०१,२५० रुपयांच्या 'ऑल टाइम हाय' पातळीवर पोहोचली आहे. चांदीच्या दरात आज १६०९ रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली. जीएसटीशिवाय चांदीचा भाव प्रति किलो २,०१,२५० रुपयांवर उघडला असून, ३ टक्के जीएसटीसह हा दर २,०७,२८७ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीसोबतच सोन्याच्या दरातही वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याचा भाव १३७ रुपयांनी वधारून १,३२,४५४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना आता १,३६,४२७ रुपये मोजावे लागणार आहेत.
या वर्षातील दरवाढीचा कल पाहिला तर सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. बुधवारी बाजार बंद होताना चांदी विना जीएसटी १,९९,६४१ रुपये आणि सोने १,३२,३१७ रुपयांवर होतं. या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात ५६,७१४ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीनं १,१५,२३३ रुपयांची प्रचंड झेप घेतली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) दररोज दोन वेळा सोन्या-चांदीचे अधिकृत दर जाहीर केले जातात.
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
कॅरेटनुसार सोन्याचे नवे दर
सोन्याच्या शुद्धतेनुसार आजच्या दरांवर नजर टाकल्यास, २३ कॅरेट सोन्याचा भाव १३७ रुपयांच्या वाढीसह १,३१,९२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला आहे. जीएसटीसह याची किंमत १,३५,८८१ रुपये झाली आहे.
दागिन्यांसाठी प्रामुख्यानं वापरलं जाणारं २२ कॅरेट सोनं १२६ रुपयांनी महागलं असून ते १,२१,३२८ रुपयांवर पोहोचलंय, तर जीएसटीसह या सोन्याचा दर १,२४,९६७ रुपये इतका आहे.
कमी कॅरेटच्या सोन्यामध्येही आज तेजी पाहायला मिळाली. १८ कॅरेट सोन्याचा भाव १०३ रुपयांनी वधारून ९९,३४१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून जीएसटीसह हा दर १,०२,३२१ रुपयांवर गेला आहे.
१४ कॅरेट सोन्याच्या दरात ८१ रुपयांची वाढ झाली असून ते ७७,४८६ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह १४ कॅरेट सोन्याची किंमत ७९,८१० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व किमतींमध्ये अद्याप मेकिंग चार्जेस जोडलेले नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष दागिन्यांची किंमत यापेक्षा जास्त असू शकते.
