Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > ट्रेडर्ससाठी मोठी अपडेट! ९ मार्चपासून सोन्या-चांदीतील ट्रेडिंगमध्ये होणार मोठा बदल, पाहा महत्त्वाची माहिती

ट्रेडर्ससाठी मोठी अपडेट! ९ मार्चपासून सोन्या-चांदीतील ट्रेडिंगमध्ये होणार मोठा बदल, पाहा महत्त्वाची माहिती

Gold Silver MCX Trading: सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पाहा कोणता होणारे मोठा बदल आणि त्याचा कसा होईल परिणाम.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:26 IST2026-02-19T10:23:20+5:302026-02-19T10:26:17+5:30

Gold Silver MCX Trading: सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पाहा कोणता होणारे मोठा बदल आणि त्याचा कसा होईल परिणाम.

Gold Silver MCX price today Trading Big update for traders big change in gold and silver trading from March 9 | ट्रेडर्ससाठी मोठी अपडेट! ९ मार्चपासून सोन्या-चांदीतील ट्रेडिंगमध्ये होणार मोठा बदल, पाहा महत्त्वाची माहिती

ट्रेडर्ससाठी मोठी अपडेट! ९ मार्चपासून सोन्या-चांदीतील ट्रेडिंगमध्ये होणार मोठा बदल, पाहा महत्त्वाची माहिती

Gold Silver MCX Trading: सोन्या-चांदीतगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या (MCX) कामकाजाच्या वेळेत ९ मार्चपासून बदल होणार आहे. या बदलामुळे गुंतवणूकदारांना ट्रेडिंगसाठी आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे. एमसीएक्सनं एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नॉन-ॲग्री कमोडिटीजमधील ट्रेडिंग आता उशिरा रात्रीपर्यंत सुरू राहील, असं त्यात नमूद करण्यात आलंय. अमेरिकेतील 'डेलाइट सेव्हिंग टाइम'शी (DST) सुसंगत राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, सर्व सदस्य आणि गुंतवणूकदारांना नवीन वेळेनुसार आपलं नियोजन करण्यास सांगण्यात आलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विविध कमोडिटीजसाठीची नवीन वेळ

नवीन परिपत्रकानुसार, सोनं, चांदी, कच्चं तेल आणि बेस मेटल्स यांसारख्या बिगर-कृषी कमोडिटीजसाठी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ११:३० वाजेपर्यंत ट्रेडिंग सुरू राहील. या कॉन्ट्रॅक्ट्ससाठी क्लायंट कोड मॉडिफिकेशन (CCM) सकाळी ९ ते रात्री ११:४५ पर्यंत करता येईल, ज्यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या पोझिशन्स सांभाळण्यासाठी अधिक वेळ मिळेल. कापूससारख्या निवडक कृषी कमोडिटीजसाठी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ट्रेडिंगची वेळ असेल, तर इतर कृषी कमोडिटीजसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व्यवहार करता येतील.

चंद्रशेखरन यांना TATA Sons मध्ये मिळणार तिसरी टर्म, रतन टाटांप्रमाणेच मिळणार सूट? जाणून घ्या

वेळेत बदल करण्याची नेमकी गरज काय?

हा बदल अशा व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष ठेवून असतात. अमेरिका आणि युरोपमधील कमोडिटी मार्केट भारतीय वेळेनुसार उशिरा रात्रीपर्यंत सक्रिय असतात. ट्रेडिंगचा कालावधी वाढवल्यामुळे आता भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक किमतींमधील हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून व्यवहार करता येतील. डेलाइट सेव्हिंग टाइम दरम्यान अमेरिकेतील घड्याळं एक तास पुढे केली जातात, ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील वेळेचं अंतर वाढतं. जागतिक स्तरावर किमतीत होणारे बदल भारतीय बाजारपेठेत योग्यरित्या प्रतिबिंबित व्हावेत, या उद्देशानं एमसीएक्सकडून हा बदल केला जातो.

ट्रेडर्स आणि ब्रोकर्सवर होणारा परिणाम

या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम सोनं, चांदी आणि कच्च्या तेलात व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होईल, कारण या वस्तूंच्या किमती थेट जागतिक घडामोडींशी जोडलेल्या असतात. त्याचबरोबर, ब्रोकर्स आणि ट्रेडिंग कंपन्यांनाही आता आपल्या यंत्रणा या नवीन वेळेनुसार अपडेट कराव्या लागणार आहेत. यामुळे जागतिक बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेण्याची संधी भारतीय गुंतवणूकदारांना अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल.

Web Title : व्यापारियों के लिए बड़ी खबर! 9 मार्च से सोने-चांदी के व्यापार में बदलाव।

Web Summary : एमसीएक्स ने 9 मार्च से सोने, चांदी, कच्चे तेल के व्यापार के घंटे बढ़ाए। अमेरिकी डेलाइट सेविंग टाइम के साथ तालमेल। व्यापारियों को वैश्विक बाजार में गतिविधियों पर प्रतिक्रिया देने के लिए अधिक समय मिलेगा। गैर-कृषि जिंसों का कारोबार रात 11:30 बजे तक।

Web Title : Big change for traders! Gold-silver trading hours extended from March 9.

Web Summary : MCX extends trading hours for gold, silver, crude oil from March 9, aligning with US Daylight Saving Time. Traders gain extra time to react to global market movements. Non-agri commodities trade until 11:30 PM, select agri until 9 PM.