Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Latest Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Silver Latest Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Silver Latest Rate Today : भारतीय सराफा बाजारात आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:50 IST2024-12-05T13:50:44+5:302024-12-05T13:50:44+5:30

Gold Silver Latest Rate Today : भारतीय सराफा बाजारात आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Latest Rate Today continue to rise check the new rates of 14 to 24 carat gold before buying | Gold Silver Latest Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Silver Latest Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Silver Latest Rate Today : भारतीय सराफा बाजारात आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने आता प्रति १० ग्रॅम ७६ हजार रुपयांच्या वर गेलंय, तर चांदी ९१ हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय स्तरावर २४ कॅरेट ९९९ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७६,५३८ रुपये आहे. तर ९९९ शुद्धतेच्या चांदीची किंमत ९१०९० रुपये आहे.

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं (India Bullion And Jewellers Association) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी २४ कॅरेटच्या शुद्ध सोन्याची किंमत ७६,३९२ रुपये प्रति १० ग्रॅम होतं, जे आज (गुरुवार) सकाळी महाग होऊन ७६,५३८ रुपयांवर पोहोचलंय. 

त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ibjarates.com नुसार, आज ९९५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७६२३२ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर ९१६ (२२ कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७०१०९ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. ७५० (१८ कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव ५७४०४ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. तर ५८५ (१४ कॅरेट) शुद्ध सोन्याचा भाव ४४७७५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

मेकिंग चार्ज, जीएसटीचा समावेश नाही

आयबीजेएनं जाहीर केलेले दर देशात सर्वमान्य आहेत. परंतु त्यात मेकिंग चार्जेस किंवा जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये मेकिंग चार्जेस आणि जीएसटी जोडल्यानंतर त्यात थोडी वाढ होऊ शकते.

Web Title: Gold Silver Latest Rate Today continue to rise check the new rates of 14 to 24 carat gold before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.